शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट विक्रीत ५ लाखांचा गंडा; सहायक नगररचनाकार गजाआड; बिल्डर फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:16 IST

फ्लॅट ताब्यात देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार सहाय्यक नगररचनाकारास गुरुवारी अटक केली आहे. तर बिल्डर अद्याप फरार आहे.

बीड : फ्लॅट ताब्यात देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार सहाय्यक नगररचनाकारास गुरुवारी अटक केली आहे. तर बिल्डर अद्याप फरार आहे.शहरातील रहिवासी सय्यद रहेमतुल्ला हे औरंगाबाद विमानतळवर शासकीय नोकर आहेत. निवृत्त झाल्यानंतर बीड शहरात घर असावे यासाठी त्यांनी २०१५ साली झमझम कॉलनीमध्ये फ्लॅट घेण्याचे ठरवले. यासाठी उमर मुश्ताक फारोखी या बिल्डरला ५ लाख रुपये दिले. तसेच कायदेशीररित्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन करार केला. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा देण्याची मागणी त्यांनी फारोखी यांच्याकडे केली. मात्र, त्याने फ्लॅट व पैसे देण्यास नकार दिला. खरेदीत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी २९ जून रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल दाखल झाला.ज्या ठिकाणी फ्लॅट घेतला होता, त्या साईटचे क्षेत्रफळ ९५७.१२ चौरस मीटर एवढे होते. मात्र, अटक केलेला सहाय्यक नगररचनाकार अधिकारी एजाज खान याने आर्थिक संगनमत करुन १०७५ मीटर क्षेत्रफळाचा पीटीआर दिला होता. यामुळे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता. मागील १५ दिवसांपासून आरोपींचा शोध सुरु होता. दरम्यान बुधवारी रात्री खबऱ्यामार्फत शहर ठाण्यातील पोलिसांना माहिती मिळाली. यावेळी आझादनगर परिसरातील एजाज खान याच्या घरी जाऊन पाहणी केली व अटक केली. ही कारवाई सहाय्यक पो.नि. पवार, उडाणशिव, गव्हाणे, डीबी पथकातील पठाण, असलम शेख यांनी केली.

टॅग्स :BeedबीडfraudधोकेबाजीArrestअटक