दीपक नाईकवाडे
केज : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ६१८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी २७७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तालुक्यातील आंधळेवाडी ग्रामपंचायतीसाठी ७ उमेदवारी अर्ज, घाटेवाडीसाठी ९, मोटेगावसाठी ७, शिंदी ग्रामपंचायसाठी ९ अर्ज आल्याने या चार ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर तालुक्यातील बोबडेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी २, पाथरा ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ५, सुकळी ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ३, तर कोरडेवाडीच्या ७ पैकी २ जागा बिनविरोध आल्या. त्यामुळे एकूण ४२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. २३ ग्रामपंचायतींच्या ४२ जागा बिनविरोध झाल्याने १९ ग्रामपंचायतींमधील १४३ जागांसाठी २९९ उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात आहेत.