शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीच्या २३ शाळांसाठी ३९ लाखांचा निधी मंजूर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:22 IST

राम लंगे वडवणी : राज्‍यातील १२ अति मागास जिल्‍ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्‍याकरिता शासन निर्णयानुसार मानव विकास मिशनची स्‍थापना ...

राम लंगे

वडवणी : राज्‍यातील १२ अति मागास जिल्‍ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्‍याकरिता शासन निर्णयानुसार मानव विकास मिशनची स्‍थापना करण्‍यात आली होती. त्‍यानंतर २०११-२०१२ पासून मानव विकास कार्यक्रमाची व्‍याप्‍ती २२ जिल्‍ह्यांतील १२५ तालुक्‍यांपर्यंत वाढविण्‍यात आली. बीड जिल्ह्यातील वडवणी हा एकमेव तालुका मानव विकासमध्ये समाविष्ट करण्यात आला असून विविध योजना राबविल्या जात आहेत.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत ई-निविदा काढून वडवणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण २३ शाळांमध्ये ३९ लक्ष रुपये खर्चून जवळपास ३ हजार ५०० विद्यार्थ्यांना संगणक लॅब स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे भाजपाचे युवा नेते धनराज मुंडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला यश आले. तसेच तालुक्यातील शाळांमध्ये ५ लक्ष रुपयांची पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहेत. ११ लक्ष रुपयांचे विज्ञान साहित्य सुद्धा वाटप होणार आहे. यासाठी सुद्धा प्रक्रिया झालेली आहे.

यामुळे वडवणी शहर व ग्रामीण भागातील ऊसतोड गरीब, होतकरू, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना खरा न्याय मिळाला आहे. चिखलबीड येथील जि.प. सदस्य अनिता मुंडे, धनराज मुंडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

या शाळांना संगणक लॅब मंजूर

जि.प.प्रा. शाळा बाहेगव्हाण, साळींबा, कन्या शाळा वडवणी, पुसरा, हिवरगव्हाण, पिंपरखेड, कवडगाव, खळवट लिंबगाव. हरिश्चंद्र पिंपरी, चिंचोटी, काडीवडगाव, परडी, लवुळ-२, देवगाव, कोठरबन, सोन्ना खोटा, पिंपळटक्का, पिंपळारुई, चिखलबीड, देवळा, खडकी, मोरवड, उपळी- खुर्द या गावांतील शाळांना संगणक लॅब मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

वडवणी तालुक्यात २३ शाळांसाठी ३९ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. तालुका शैक्षणिक दृष्टीने मागास असल्याने व मानव विकास निर्देशांक कमी असल्याने तो वाढविण्यासाठी शासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गुणवत्ता वाढेल. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल.

- बाबासाहेब उजगरे, गटशिक्षण अधिकारी, वडवणी