शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बीडमध्ये धारदार शस्त्रांसह ३६ पोती गुटखा जप्त; एलसीबी, पेठबीड पोलिसांच्या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:06 IST

छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर मंगळवारी सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देछुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर आज  सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली.

बीड : छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणार्‍या पेठबीडमधील इस्लामपुरा भागातील माफियाच्या घरावर आज  सकाळी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये धारदार शस्त्रांसह तब्बल ३६ पोती गुटखा, एक स्कूटी व जीप जप्त करून तिघांना गजाआड केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पेठबीड पोलिसांनी केली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

इस्लामपुरा भागात शेख सर्फराज उर्फ शप्पू याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी आपल्या खबर्‍यांमार्फत खात्री करून घेतली. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी सापळा लावण्यात आला. जीपमधून गुटखा येताच पोलिसांनी शप्पूच्या घरावर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३६  पोती गुटखा जप्त केला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक तलवार, एक कुकरी व एक सुरा असे धारदार शस्त्र आढळून आले. तसेच गुटखा वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली नवी कोरी जीप व एक स्कूटी जप्त करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यावरच याची खरी किंमत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पेठबीडचे पोनि बाळासाहेब बडे, सपोनि सचिन पुंडगे, परमेश्वर सानप, गोरख मिसाळ, बाबु उबाळे, मोहन क्षीरसागर, दत्तात्रय गलधर, अनिल डोंगरे, ठोंबरे, विष्णू रोकडे, पाईकराव, हरी बांगर, शेख आशेद, नाईकवाडे, जाधव, मोमीन, सानप, राठोड आदींनी केली.

अन्न सुरक्षा अधिकारी रजेवरपोलिसांनी कारवाई करून गुटखा ताब्यात घेतला. परंतु त्यापुढील कारवाईचे अधिकारी केवळ अन्न व औषध प्रशासनाला आहेत. येथील कार्यालयात मनुष्यबळ अपुरे आहे. केवळ एकच अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. त्या सुद्धा सध्या रजेवर असल्याने त्यांचा पदभार नांदेड येथील सुरक्षा अधिकार्‍यांकडे आहे. विशेष म्हणजे नांदेड येथेही मंगळवारी गुटख्याची कारवाई झालेली आहे. त्याच कारवाईत नांदेडचे सुरक्षा अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना बीडच्या कारवाईकडे येता आले नाही. बुधवारी सकाळी येऊन ते कारवाई करतील, असे सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांनी सांगितले.

शप्पूवर झाला होता गोळीबारसाधारण तीन महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळून घरी जात असताना शप्पूवर गोळीबार झाला होता. यामध्ये तो बालंबाल बचावला होता. हा हल्ला गुटख्याच्या वादातूनच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात होता. मंगळवारी सापडलेल्या गुटखा साठ्यावरून याला दुजोरा मिळाला. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

राजकीय पुढार्‍यांचा होता पोलिसांवर दबावशप्पूवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांना अटक करा, या मागणीसाठी काही राजकीय पुढार्‍यांनी पोलिसांना चांगलेच परेशान केले होते. त्यानंतरही काही पुढार्‍यांनी पत्रकबाजी करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता शप्पूच्या घरी गुटखा सापडल्याने त्याला पत्रकबाजी करणार्‍या राजकीय व्यक्तींचा पाठबळ आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात असून अनेक बड्या पुढार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Beedबीड