शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पित्राच्या जेवणातून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 14:47 IST

शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे.

परळी ( बीड ) : शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे. यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कृष्णानगर भागातील नागरिकांना रविवारी रात्री उशिरा मळमळ होणे, उलट्या, गरगरणे अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला काही लोकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, हळूहळू ही संख्या वाढली. काल या गल्लीत पित्राचे जेवण होते. जे लोक या जेवणाला आले होते त्यातील बहुतांश लोकांना हा त्रास जाणवू लागला. यात ३० जणांना विषबाधा झाली आहे. जेवणामधून विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, या भागातील नागरिकांना विषबाधा झाल्याचे कळताच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी धाव घेऊन या रुग्णांना उपचार व मदतकार्य करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांवर तातडीने सर्व उपचार सुरू करण्यात आले असून रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच यातील अत्यवस्थ असलेल्या २० जणांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. तर अन्य १० रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉक्‍टर पारस मंडलेचा यांनी सांगितले.