शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात अडीच महिन्यांत ३० शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:43 IST

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देआत्महत्या रोखण्यात शासन-प्रशासनाला अपयश

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवू लागले आहेत. मागील अडीच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु अद्याप त्यांना यामध्ये यश आले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा, लोकसभेत बीड जिल्ह्यातील आत्महत्यांचा विषय गाजला होता. त्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त जिल्हा बीडची घोषणा करण्यात आली. तसेच आत्महत्या रोखण्यासठी स्थानिक पातळीवर विविध योजना राबवल्या गेल्या. जनजागृती अभियान राबवले गेले. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. शासन, नाम फाऊंडेशन व इतर संस्थांकडून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देखील केली गेली.

शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणी मात्र अजून केली गेली नाही. त्यामध्येच नगदी पीक असलेल्या कापसावर बोंडअळीने हल्ला केला. त्यामुळे उत्पादनात घट झाली. तसेच कापसाला भावही चांगला न मिळाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला. कापसाला योग्य भाव नसल्यामुळे आज देखील जिल्ह्यात ६० टक्क्यांवर कापूस शेतकºयांडेच आहे. अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रांवर तूर उत्पादक शेतकºयांची अडवणूक करण्यात आली. तसेच शेतात काम करणाºयांची मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.कर्जमाफीच्या अंमलबजावणीची मागणीशासनाने कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी, बोंडअळीमुळे झालेली नुकसानभरपाई सरसकट द्यावी, तूर, कापसाला हमी भाव द्या, अशी मागणी शेतकरी नितीन खंडागळे, अशोक खंडागळे यांनी केली आहे.