शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नागझरी खून प्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:43 IST

नागझरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून संजय काकासाहेब चव्हाण नामक २० वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी गेवराई ठाण्यात रविवारी रोजी १८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील नागझरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून संजय काकासाहेब चव्हाण नामक २० वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी गेवराई ठाण्यात रविवारी रोजी १८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.शनिवारी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्राने छातीवर व पोटावर वार करून संजय यास गंभीर जखमी केले होते. वडार गल्ली भागातील रस्त्यावर तो जखमी अवस्थेत पडलेला होता. याचवेळी त्याची बहीण मालन काकासाहेब चव्हाण येथील हातपंपावर पाणी आणण्यासाठी गेली होती. तो तेथे पडलेला दिसला यावेळी बहीणीने त्याला काय झाले विचारणा केली असता त्याने नारायण भारत पवार, पप्पु भारत पवार, रोहिणी शहाद्या चव्हाण, संगिता साईनाथ भोसले यांनी मारल्याचे सांगितले. यातील दोघींनी माझे हात धरले व दोघांनी धारदार शस्त्रांनी वार केले व वडार गल्ली भागात आणून टाकल्याचे संजयने सांगितले होते.या प्रकरणी मयत संजयच्या बहिणीच्या फिर्यादीवरुन शिवकन्या पवार, सिमा पवार, आगलाव्या पवार, गोट्या पवार, सरस्वती पवार, रमेश गायकवाड (सर्व रा. बांगरनाला वस्ती बालेपीर बीड) तसेच जावेद चव्हाण, शहादया चव्हाण, देवगण चव्हाण, सोनी चव्हाण, चायना चव्हाण, छप्पन चव्हाण सर्व रा. नागझरी, विश्वास चव्हाण रा. रेवकी, नागनाथ काळे रा. शेवगाव, जि. अहमदनगर याच्यांविरूद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे करीत आहेत.यांना झाली अटक : पथके रवानादरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सूचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके, दरोडा प्रतिबंधक पथक, गेवराई पोलीस ठाण्याचे एक पथक अशी चार पथके आरोपीचा शोध घेत आहेत.खून प्रकरणी रोहिणी शहादया चव्हाण, सिमा पप्पु पवार, संगिता साईनाथ भोसले, सरस्वती भारत पवार, रमेश गायकवाड, विश्वास चव्हाण यांना पोलीसांनी अटक केली.यातील पाच आरोपींना बीड येथून, तर एकास नागझरी शिवारातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गेवराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनArrestअटकCrime Newsगुन्हेगारी