बीड : दुचाकी चोरून त्यावर सैरसपाटा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडील तीन दुचाकी जप्त केल्या. दुचाकी चोरीचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. या गन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले. पथकातील अधिकारी व कर्मचारी केज, नेकनूर, युसूफ वडगाव हद्दीत २६ डिसेंबर रोजी गस्तीवर होते. मधुकर गणपत काळे रा. सावळेश्वर पैठण व देविदास बन्सी काळे हे दोघे चोरीच्या दुचाकीवरून आल्याची माहिती मिळाल्यावर नांदूर फाटा परिसरातून त्यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता ही दुचाकी येळंबघाट येथून चोरल्याचे सांगितले. त्यावरून नेकनूर पोलीस ठाण्यात या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री करण्यात आली. अधिक चौकशीनंतर त्यांनी लातूर व दिंद्रुड येथून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. दोघांच्या ताब्यातील एक व घरातून दोन अशा तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दोन चोरट्यांकडून ३ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST