शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाळा येथील २८ शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

लातूर ते लोखंडी सावरगाव हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे. सिमेंटचा ...

लातूर ते लोखंडी सावरगाव हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पूर्ण करण्यात आला आहे. सिमेंटचा हा रस्ता बनवताना अंबाजोगाई तालुक्यातील व परळी मतदारसंघातील बर्दापूर, सेलूअंबा व वाघाळा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना त्वरित याचा मावेजा दिला जाईल, असे सांगून या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. वाघाळा येथील रस्ता व उड्डाणपूल करण्यासाठी येथील ६७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. यापैकी ३९ शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. हा मोबदला देताना शेतकऱ्यांची तोंडे पाहून हा मोबदला देण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. जमीन संपादित करून तीन वर्षे झाले तरी लाभार्थ्यांना राष्ट्रीय महामार्गाकडून भूसंपादनाची रक्कम मिळाली नाही. हा पूल बांधताना अनेकांची घरे उद्‌ध्वस्त करून याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते; परंतु मागील एक वर्षापासून उड्डाणपुलाचे काम रखडल्याने येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मला वेळ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता रोहिदास गायकवाड यांनी सांगितले.

माझे वाघाळा रस्त्यालगत घर आहे. घरासमोरील अर्धा गुंठा जागा महामार्गाच्या वतीने भूसंपादित करण्यात आली आहे. कार्यालयाचे उंबरठे झिजवून व अधिकाऱ्यांच्या विनवण्या करूनही अद्याप याचा मोबदला मला मिळाला नाही.

- अमोल पतंगे

(रहिवासी, वाघाळा)