शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला २०० लोकांची परवानगी, पण चार महिने मुहूर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये ...

बीड : सेकंड अनलॉकमध्ये कोविड-१९ संबंधित नियमांच्या अधीन राहून शासनाने निर्बंध शिथिल करीत परवानगी दिल्याने आधी ५० लोकांमध्ये होणारे विवाह सोहळे आता यापुढे २०० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. मात्र शुध्द मुहूर्त आणि लग्नसराई होऊन गेल्यानंतर शासनाने परवानगी दिल्याने त्याचा काय उपयोग? अशा प्रतिक्रिया मंगल कार्यालय चालक, मालक तसेच बँड पथकांच्या प्रमुखांनी व्यक्त केल्या.

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून मंगल कार्यालये बंद आहेत. तर विवाहासाठी उपस्थितीची मर्यादा घातल्याने अनेकांनी साधेपणाने लग्न उरकून घेतले. तर काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठी गर्दी जमवून विवाह आयोजनाबद्दल वधू-वर पक्षाकडील मंडळींसह हॉटेल, मंगल कार्यालय चालकांवर कारवाया झाल्या. आता २०० लोकांना उपस्थितीसाठी परवानगी दिली तरी तारखा नसल्याने मंगल कार्यालय, बँड, आचारी, केटर्सकडे बुकिंगच नसल्याची स्थिती आहे. कारण चातुर्मासात विवाह करण्याचे अनेक जण टाळतात.

लग्नसमारंभासाठी या आहेत अटी

लॉन : खुले प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्वांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार.

या संलग्न संस्थांमधील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे ओळखपत्रासह कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे (दोन्ही डोस) प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

----------

आता चार महिने तारखाच नाहीत, त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काय उपयोग? मोठे मुहूर्त होऊन गेले. मागील १८ महिन्यांतील नुकसान कधीही भरून येण्यासारखे नाही. तिसरी लाट आली तर पुन्हा संकट आहेच. सध्या बुकिंग नाही. कार्तिक पौर्णिमेनंतरच काय ते कळेल.

- संतोष सोहनी, मंगल कार्यालय मालक, बीड

----------------

शासनाने परवानगी दिली असली तरी श्रावणमास सुरू आहे. चातुर्मासात लोकांची मानसिकता नाही. तिसरी लाट आल्यास बुकिंगचे पैसे परत मिळतील का? त्यावेळी किती लोकांसाठी परवानगी असेल का? अशी चौकशी लोक करतात, त्यामुळे विवाहाच्या बुकिंग झालेल्या नाहीत.

- रवींद्र शिवणीकर, मंगल कार्यालय चालक, बीड

---------

कोरोनामुळे मागील सतरा महिन्यांपासून बँडवर निर्बंध असल्याने कलाकारांची मोठी उपासमार झाली. अजूनही या आर्थिक संकटातून कोणी सावरलेले नाही. आता शासनाने परवानगी दिली असली तरी तारखाच नसल्याने बँडसाठी ऑर्डर कोठून मिळणार?

- अरुण दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

-------------

कोरोनामुळे बँड कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. दीड वर्ष कसे काढले आम्हालाच माहीत. लग्नसराईचा मोसम होऊन गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंद वाटण्यासारखे काही नाही. कारण ऑर्डर नाहीत. दिवाळीनंतरच कळेल.

- देवीदास दोडके, बँड पथक प्रमुख, बीड

------------

लग्नाच्या तारखा

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये शुद्ध मुहूर्त नाहीत. मात्र १८, २०, २१, २५, २६, २७, ३०, ३१ ऑगस्ट व १, ८, १६, १७ सप्टेंबर या गौण मुहूर्ताच्या तारखा आहेत.

----

आषाढापासून चातुर्मासाचा कालावधी विवाहासाठी निषिध्द मानलेला आहे. चातुर्मासात होणाऱ्या विवाहांना शास्त्राधार नाही. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाहाचे शुद्ध मुहूर्त नाहीत. अत्यंत अडचण असणारेच विवाह करतात, ते प्रमाण तुरळक असून साध्या पध्दतीने उरकले जातात.

- राहुल जोशी, पुरोहित, बीड

--------