बीड : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या पंचायत समिती, आरोग्य विभाग व मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची आराेग्य तपासणी केली. यात १८ टक्के कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) तर १२ टक्के लोकांना मधुमेह (डायबीटीज) सारखे गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. सुंदर माझे कार्यालय मोहिमेंतर्गत जिल्हाभरात शनिवारी आरोग्य तपासणी केली होती. यातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील सरकारी कार्यालये जशी सुंदर केली जात आहेत, तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सदृढ रहावे, या उद्देशाने शनिवारी जिल्ह्यातील जि.प.अंतर्गत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी २५ ठिकाणी पथकांची नियुक्ती केली होती. सुटीमुळे तपासणी शिबिराला प्रतिसाद कमी मिळाला असला तरी झालेल्या तपासणीतून कर्मचाऱ्यांना गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. एका दिवसांत ९७७ कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता १७५ लोकांना उच्च रक्तदाब तर ११९ जणांना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी या सर्व तपासणी आढावा घेतला.
आरोग्य विभागच 'आजारी'
ग्रामीण आरोग्य विभागातील ७५ लोकांची आरोग्य तपासणी केली. यात तब्बल ४३ लोकांना कोमाॅर्बिड आजार निष्पन्न झाले. दुसऱ्यांचे आरोग्य सांभाळणाऱ्यांचे आरोग्य बिघडल्याचे दिसून येते.
कोट
जिल्ह्यात सर्वत्र जि.प.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. शनिवारी दिवसभरात ९७७ लोकांची तपासणी केली असता २९४ लोकांना कोमाॅर्बिड आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार करून काळजी घेण्याबाबत सल्ला देण्यात आला.
डॉ.नरेश कासट, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
अशी आहे आकडेवारी
एकूण तपासणीउच्च रक्तदाबमधुमेह
पं.स. गेवराई ६६ ९११
पं.स.धारूर ५१ १५ ३
पं.स.वडवणी ३३ २४
आरोग्य विभाग जि.प.बीड ७५ २३ २०
जि.प.मुख्यालय ९० १५ ९
बांधकाम, वित्त, लपावि ८४ १८ १
पं.स.बीड ९१ २८ १५
पं.स.केज ७७ ८ १८
पं.स.शिरूर ६८ ५३
पं.स.पाटोदा ८१ २९
पं.स.परळी ५२ १० १०
पं.स.अंबाजोगाई ८३ २७ ५
पं.स.माजलगाव ९५ ०४
पं.स.आष्टी ५१ १० ७