लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : हैदराबादहून माजलगावकडे येणारा गुटख्याचा ट्रक माजलगाव पोलिसांनी पकडला. यामध्ये तब्बल १७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री तेलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केली.माजलगाव येथे नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अवैध धंद्याविरूध्द मोहिम हाती घेतली आहे. आठवड्यापूर्वीच माजलगावात एका घरावर धाड टाकून लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा मोठी कारवाई केली.हैदराबादहुन माजलगावकडे एका ट्रकद्वारे (एमएच ४३ वाय ७२९७) गुटखा येत असल्याची माहिती नवटके यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी तेलगाव येथे सापळा लावला. माहिती मिळालेला ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याचे पोते आढळून आले. याची किंमत जवळपास १७ लाख रूपये आहे. गुटख्यासह राज नायक व कुमार नायक (रा. हैदराबाद) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तेलगावात पकडला १७ लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:59 IST
हैदराबादहून माजलगावकडे येणारा गुटख्याचा ट्रक माजलगाव पोलिसांनी पकडला. यामध्ये तब्बल १७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री तेलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केली.
तेलगावात पकडला १७ लाखांचा गुटखा
ठळक मुद्देहैदराबादहून आवक : उपविभागीय अधिका-यांची आठवडाभरात दुसरी कारवाई