शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

तीन दिवस रुग्णालयात राहूनही १५३६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

बीड : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी मृत्यूसत्र कायम आहे. तीन दिवस रुग्णालयात राहूनही तब्बल १५३६ रुग्णांचा ...

बीड : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी मृत्यूसत्र कायम आहे. तीन दिवस रुग्णालयात राहूनही तब्बल १५३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उशिराने दाखल झाल्याने म्हणजे दाखल झाल्यापासून २४ तासांच्या आत मृत्यू झालेल्यांचा आकडा ४५० एवढा आहे. मंत्र्यांनी आढावा घेण्यापूर्वी जिल्ह्यात २३८९ कोरोनाबळींची नोंद झालेली आहे. त्याचे वर्गीकरण ‘लोकमत’ मांडले आहे. हे मृत्यूसत्र थांबविण्यासाठी उपचारातील दर्जा सुधारण्यासह उपाययोजना करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ५२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पैकी ८६ हजार ७७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा टक्का समाधानकारक असला तरी मृत्यूदर राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा अधिक आहे. हाच धागा पकडून राज्याचे मंत्रिमंडळ जिल्ह्याचा आढावा घेऊन गेले. मृत्यूचे ऑडिट करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या; परंतु आतापर्यंत झालेल्या मृत्यूचे केवळ ऑडिट करण्यात आले, त्यावर उपाययोजना करून मृत्यू आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेत जवळपास ५०० मृत्यू झाले होते; परंतु दुसऱ्या लाटेतील मृत्यूसंख्या दीड हजार पार गेली आहे. यात ज्येष्ठांसह तरुणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मृत्यूला जेवढा उपचाराच्या बाबतीत आरोग्य विभाग जबाबदार आहे, तेवढेच रुग्णही आहेत. भीतीपोटी अंगावर दुखणे काढून उशिराने रुग्णालयात दाखल झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लक्षणे जाणवताच तत्काळ रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.

---

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. ज्याचा एचआरसीटी स्कोअर १ होता, तोच चार दिवसांनी १५पेक्षा जास्त झाल्याची उदाहरणे आहेत. यावरून वेगाने संसर्ग पसरत असल्याचे दिसले. तसेच दुसऱ्या लाटेत कोमॉर्बिड आजार असलेल्या जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूचे ऑडिट करून सुधारणा केल्या जात आहेत. मृत्यू कमी करणे, हाच संकल्प आहे.

डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

---

कोणत्या संस्थेत किती मृत्यू

स्वाराती, अंबाजोगाई ९३०

जिल्हा रुग्णालय बीड ५११

ट्रॉमा केअर, आष्टी १५२

नर्सिंग हॉस्टेल, बीड ९७

महिला रुग्णालय लोखंडी सावरगाव ८५

वृद्धत्व रुग्णालय लोखंडी सावरगाव ३६

ट्रॉमा केअर गेवराई ३०

खाजगी व इतर ५४८

--

तालुका०-२४ तास२४-४८ ४८-७२ ७२ तासांनंतरएकूण

अंबाजोगाई १२२ ५४ ३९ २८९ ५०४

आष्टी ५१ २१ २० १७६ २६८

बीड ६६ ४१ ४७ ३४९ ५०३

धारूर १७ ९६ ७१ १०३

गेवराई २६ १६ ८ १०६ १५६

केज ४९ २२ २१ १४४ २३६

माजलगाव ३० २४ ७ १३१ १९२

परळी ५९ २८ १९ १२६ २३२

पाटोदा १८ ६५ ५९ ८८

शिरूर६३१ ५५ ६५

वडवणी६६० ३० ४२