शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या हव्यासापायी जन्मदात्याने आवळला १३ वर्षांच्या मुलाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST

बीड : तीन लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी जन्मदात्याने १३ वर्षीय मुलाचा गळा ...

बीड : तीन लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी जन्मदात्याने १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील खडकीघाट येथे १५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पित्याला जेरबंद केले आहे.

राकेश उमेश वाघमारे (१३, रा. खडकीघाट, ता. बीड) असे मयताचे नाव आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी खडकी घाट येथील वस्तीवरील घरात राकेशचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. राकेशचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातच त्याचा पिता उमेश वाघमारे हा पहाटेपासून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख यांनी तपासचक्रे गतिमान केली. उमेश हा बसने पाटोद्याहून पुण्याकडे जात असल्याचे समजल्यावर नेकनूर व पाटोदा पोलिसांनी बसस्थानकात सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. पंचनामा करून राकेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, आरोपीने खुनाची कबुली दिली असून त्यास १६ रोजी न्यायालयात हजर केले जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.

....

असा रचला कट

आरोपी उमेश वाघमारे याने तीन विवाह केलेले आहेत. त्याची पहिली पत्नी त्याला साेडून गेली तर दुसरीने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच त्याने तिसरा विवाह केला होता. तिच्यासह तो बीड शहरात वास्तव्यास आहे. दरम्यान, मृत राकेश हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तो गावी खडकीघाट येथील वस्तीवर आजी अजोबांकडे राहतो. राकेशच्या नावावर काही जमीन आहे. राकेशला संपविल्यानंतर ही जमीन आपल्याला मिळेल म्हणून उमेशने त्याच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी तो १४ रोजीच मुक्कामी खडकीघाट येथे आला होता. मध्यरात्रीनंतर त्याने झोपेत त्याचा गळा आवळून पोबारा करण्याचा प्रयत्न केला.

----

150921\15bed_17_15092021_14.jpg

आरोपी