शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत १२५ जातींचे विविध वृक्ष - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

अंबाजोगाई : ‘हरित अंबाजोगाई’ तर्फे अंबाजोगाई शहरातील झाडांच्या सर्वेक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. अतिशय अवघड ...

अंबाजोगाई : ‘हरित अंबाजोगाई’ तर्फे अंबाजोगाई शहरातील झाडांच्या सर्वेक्षणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. अतिशय अवघड असलेले हे काम या टीमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहा महिन्यात पूर्ण केले. अंबाजोगाईतील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मस्जिदी, चर्च, मठ, स्मशानभूमी, कब्रस्थान व शासकीय कार्यालये याठिकाणच्या झाडांची नोंद या सर्वेक्षणात घेण्यात आली. ‘पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून या सर्वेक्षणाचा अहवाल अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना ग्रुपच्या वतीने डॉ. शुभदा लोहिया यांनी सुपूर्द केला.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने तयार होणाऱ्या घनवन प्रकल्पात हरित अंबेजोगाईच्या सदस्यांनीही काही झाडे लावली. वृक्ष सर्वेक्षणाच्या या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाबद्दल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही उत्सुकता दाखवली व या प्रकल्पाचे कौतुक केले. या वृक्ष सर्वेक्षणात कमलेश परधडिया, अनंत मलवाड, गणेश वेदपाठक, विशाल जगताप , पायल भुतडा, शैलजा पवार , रेणुका गिरवलकर, अनुष्का लोहिया, गुरुदत्त तिवारी, दीपाली माहूरकर, अजिंक्य कुलकर्णी व इतरही बऱ्याच जणांनी सहभाग नोंदवला. या संपूर्ण सर्वेक्षणाला प्रा. अभिजीत लोहिया, प्रा. डॉ. कल्याण सावंत , प्रा. गिरीश कुलकर्णी, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष मांडले गेले त्यावर नक्कीच विचार केला जाईल व त्याचा उपयोग पुढील काळात अंबाजोगाईमध्ये होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या वेळी केला जाईल असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांनी दिले.

सर्वेक्षणातील माहिती नोंदविलेले निरीक्षण १) अंबाजोगाईमध्ये एकूण १२५ प्रकारच्या विविध जातींचे वृक्ष आहेत.

२) घनवन प्रकल्पात लावलेले वृक्ष सोडून पाच फुटांच्या वरचे साधारण २१ हजार १७० वृक्ष सध्या अस्तित्वात आहेत. ३) सप्तपर्णी, पाम, सुबाभूळ या झाडांची संख्या खूप जास्त आहेत. त्यामुळे यापुढे झाडे लावताना शक्यतो ही झाडे न लावता हिवर, धावडा, काटेसावर, वावळ, हिरडा, बेहडा, अंजन, कांचन इत्यादी प्रकारची झाडे लावणे आवश्यक आहे.

४)पांगारा, रुक्मिणी, मोहगनी, पिल्लू, बर्मा, दुरंगी बाभूळ, कांचन, पळस, काळा कुडा, नांदुरकी, धामण, शिवण, रिठा, कवठ, बहावा, ताम्हण, तुती या वृक्षांची संख्या खूपच कमी आहेत. यापुढे हे वृक्ष लावणे अत्यंत आवश्यक आहे. ५) सार्वजनिक बागांमध्ये व सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्रीन बेल्टमध्ये बऱ्याच ठिकाणी सारख्याच प्रकारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. यापुढे अशा ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लावणे आवश्यक आहे. असे निरीक्षण या सर्वेक्षणातून निदर्शनास आले.