शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील १०० अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

बीड : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांचे ‘आदर्श’ अंगणवाडी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट शासनाकडून उपलब्ध ...

बीड : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांचे ‘आदर्श’ अंगणवाडी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा असलेल्या १०० अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. आनंददायी शाळेप्रमाणे अंगणवाडीतही आनंदी वातावरण निर्मिती होणार असून, रुपडे पालटणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला होता. त्यानुसार स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या मान्यतेने ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांची प्रक्रिया पूर्ण होऊन आता अंगणवाड्यांना स्मार्ट किटचे वाटप होणार आहे. बीड जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांना स्मार्ट किट वाटप लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९७ पैकी ३० बिटमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी करण्याचे पहिल्या टप्प्यात नियोजन आहे. किटमधील तांत्रिक साहित्य कार्यन्वित झाल्यानंतर अंगणवाड्यांचा कायापलट झाल्याचे दिसून येणार आहे.

काय आहे स्मार्ट किट?

अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्ट किटमध्ये सौर विद्युत व्यवस्थेचे पॅनल इन्व्हर्टर, बॅटरी , छोटे ट्यूब, डीसी पंखे, ई-लर्निंगसाठी ३२ इंच एलईडी टीव्ही, भिंतीवर लावण्यासाठी शैक्षणिक चित्र आणि चार्ट, प्राथमिक पूर्व शिक्षण देणाऱ्या उपक्रमांची माहिती, धडे, बडबड गीत आदी शैक्षणिक बाबींचा समावेश असलेले पेन ड्राइव्ह, डेस्क फ्लोर सेटिंगचा समावेश आहे.

स्वच्छ भारत कीट

या किटमध्ये लिक्विड सोप हॅन्डवाॅश, साबण, पाण्याची बाटली, हातरुमाल, कंगवा, नेलकटर, स्टील कात्री, क्लिनिंग पावडर, आठ ते दहा लिटर क्षमतेचे ऑफलाइन वॉटर प्युरिफायर, हॅन्डवॉश बेसिनसाठी ३५ लिटर स्टेनलेस स्टीलचा टँक आणि स्टॅन्ड अशी ही सामग्री आहे.

-------------

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांमार्फत अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर होणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०० अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किट शासनाकडून प्राप्त होणार आहेत. यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

- यशोदा बाबूराव जाधव, सभापती, महिला व बालकल्याण समिती जि. प. बीड

--------------

अंगणवाडी केवळ खाऊघर न राहता लाभार्थी मुलांना मनोरंजनातून शिक्षण मिळावे, आरोग्य शिक्षणासह स्वच्छतेची सवय लागावी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या सकारात्मक हेतूने अंगणवाडी स्मार्ट करण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच सोलार पॅनलमुळे विद्युत बचतीसह शाश्वत सुविधा मिळणार आहे.

-- रामेश्वर मुंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण जि. प. बीड

--------

बीड जिल्ह्यातील अंगणवाड्या २९५७

प्रकल्प १३

बीट ९७

पहिल्या टप्प्यात स्मार्ट होणाऱ्या अंगणवाड्या १००

-------------