शाम्पू वापरताना कुठल्या गोष्टी फॉलो कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:30 IST
अनेक जण या संभ्रमात असतात की शाम्पू करावा की नाही आणि जर केला तर रोज करावा की एक दिवसाआड? कारण, केस...
शाम्पू वापरताना कुठल्या गोष्टी फॉलो कराल?
अनेक जण या संभ्रमात असतात की शाम्पू करावा की नाही आणि जर केला तर रोज करावा की एक दिवसाआड? कारण, केसांच्या पोषक वाढीसाठी त्यांची योग्य प्रकारे निगा राखणे फार गरजेचे असते. अशी निगा राखण्याला पुढील चार स्टेप्स तुमची नेहमी मदत करू शकतात.स्टेप १ : शाम्पू करण्यापूर्वी केस ओले करा : डोक्याला शाम्पू करण्याआधी पाण्याने केस धुऊन घ्या. केसातील सर्व घाण, मळ साध्या पाण्याने साफ करूनच शाम्पू करा. जास्त गरम पाणी वापरल्यामुळे केसांच्या वाढीला इजा पोहचू शकते म्हणून कोमट पाण्याचाच वापर करा.स्टेप २ : शाम्पू लावा : कोमट पाण्याने केस ओले केल्यावर शाम्पू लावावा. शाम्पू रोज लावल्याने कोणताही दूष्परिणाम होत नाही, हा केवळ गैरसमज आहे. पण हो, तुमचे केस जर मोठे, लांब, रुक्ष असतील तर एक दिवसा आड शाम्पू करणे चांगले राहील.स्टेप ३ : कंडिशनर : कंडिशनर लावण्याची पद्धत ही शाम्पूच्या एकदम उलट असते. डोक्याऐवजी आधी केसांच्या टोकांपासून कंडिशनर लावाण्यास सुरुवात करा. कंडिशनर लावल्यानंतर किमान एक-दोन मिनिटे तरी तसेच राहू द्या आणि मगच धुवा.cnxoldfiles/कोमट पाण्याने परत एकदा केस धुवावेत. केसांच्या पोषक वाढीसाठी थंड पाणी वापरा. त्यासमुळे क्युटिकल्स बंद होऊन केसांची चमक टिकून राहते.