(Image Credit : Medical News Today)
कॅन्सरशी लढणं सोपं नसतं, खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही महिला असाल आणि उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या किमोथेरपीमुळे सर्वातआधी नुकसान केसांचं होतं. तुमचे केस कितीही मजबूत असले, त्यांची क्वॉलिटी कितीही चांगली असतील तरी किमोथेरपीमुळे केसांवर नकारात्मक प्रभाव पडतोच. अशात केसांबाबत काळजी करत बसण्यापेक्षा काही उपाय करा.
पुन्हा केस येतात का?
किमोथेरपीनंतर केस किती दिवसांनी परत येतील हे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर किमो आणि औषधांचा किती वाईट प्रभाव झालाय यावर अवलंबून असतं. कीमोथेरपी संपल्यावर २ ते ३ आठवड्यानंतर सर्वातआधी थोडे सॉफ्ट केस येतात. नंतर साधारण १ महिन्यानंतर योग्य पद्धतीने केस येणे सुरु होतात. २ ते ३ महिन्यानंतर साधारण १ इंच केस लांब होतात आणि केस कंगव्याने करण्याइतके येण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागतो.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं सेवन
गेलेले केस परत मिळवायचे असतील तर तुम्ही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं सेवन करावं. सप्लिमेंट्स घेण्यासोबतच तुमच्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा वापर करा ज्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अधिक असतील. हेल्दी हेअर फॉलिकल्ससाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चं सेवन फायदेशीर मानलं जातं. तर डोक्याच्या त्वचेचं ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी फार महत्वपूर्ण असतं. त्यामुळे तुम्ही आहारात फळ, टोमॅटो, ब्रोकली, भुईमूगाच्या शेंगा, एवकोडा, पालक, अंडी आणि माश्यांचा समावेश करा.
हाय प्रोटीन फूड
तुम्हाला हे माहीत असेलच की, आपले केस प्रोटीनपासून तयार होतात. त्यामुळे आहारातूनही प्रोटीन पदार्थांचा समावेश करावा. केस लवकर येण्यासाठी डाएटमध्ये प्लांट प्रोटीनसोबतच इतरही प्रोटीनच्या स्त्रोतांचा समावेश करा.
फॅटी अॅसिड
केसांची वाढ करण्यासाठी तुम्ही आहारात ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांसोबतच सप्लिमेंट्सचा समावेश करु शकता.
तेल मालिश करा
किमोथेरपीनंतर केस पुन्हा यावे यासाठी केसांना तेलाने मालिश करा. यासाठी तुम्ही रोजमेरी, लॅवेंडरसारख्या तेलांना किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करु शकता. डोक्याच्या त्वचेची चांगल्याप्रकारे मालिश करु शकता. याने केस मजबूत होतात आणि केसांची वाढही होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)