उन्हाळ्यात ताक अमृतासमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 09:14 IST
दही यापासून तयार करण्यात आलेले ताक उन्हाळ्यात अमृतासमान असते.
उन्हाळ्यात ताक अमृतासमान
यामध्ये सर्व प्रकारच्या पौष्टिक गुणधर्माचा समावेश असतो. जेवणानंतर दररोज ताकाचे सेवन केले तर कोणताही आजार होत नसल्याचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. ज्यांना दही खाणे आवडत नसेल त्यांनी ताक हे खाल्लेच पाहीजे. यामध्ये काळे मीठ, जिरे व हिंग टाकले तर ते एकदच चविष्ट लागते. पोट दुखत असेल तर त्यासाठी ताक हे उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड होण्यासाठी ताक हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे जेवणही पचन होण्यास मदत होते. तिखट तसेच मसालेदार जेवणानंतर ताकाचे सेवन करावे. त्यामुळे अपचनही होत नाही.जेवणानंतर बटर टाकून ताक प्यावे. ज्यांना दुध पिणे आवडत नाहीत त्यामुळे त्यांच्यात कॅल्शिअमची कमतरता असते. त्यामुळे अशा लोकांनी ताकाचे सेवन केले तर त्यांना मोठ्या प्रमाणात कॅ ल्शिअम मिळते.त्याकरिता दररोज ताक पिण्याचे सवय लावावी.कॅल्शिअमबरोबरच ताकामध्ये प्रोटीन, विटामिन बी व पोटेशिअमचेही प्रमाण असते. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. ज्या महिलांचे केस गळत असेल तर त्यांच्यासाठी ताक उपयुक्त आहे. अशा महिलांनी आठवड्यात दोन दिवस केस ताकाने धुवून काढावे. चेहºयावरील सुरकत्यासुद्धा यामुळे कमी होतात