शुद्ध शाकाहारी प्रोटीन स्त्रोत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:56 IST
आपल्या संपूर्ण शरीरासाठी प्रोटीन खूप आवश्यक असते. केसांपासून ते नखांपर्यंत आणि मसल बिल्डअपसाठीसुद्ध...
शुद्ध शाकाहारी प्रोटीन स्त्रोत
आपल्या संपूर्ण शरीरासाठी प्रोटीन खूप आवश्यक असते. केसांपासून ते नखांपर्यंत आणि मसल बिल्डअपसाठीसुद्धा प्रोटीनच गरजेचे असते. काबरेत्कांपेक्षा प्रोटीन पचण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे जास्त काळापर्यंत आपली ऊर्जा टिकून राहते. ऊज्रेचा प्रमुख स्रोत म्हणजे प्रोटीन. शाकाहारी लोकांसाठी पुढील पाच प्रोटीन स्त्रोत फायद्याचे आहेत.१. बीन्सया पदार्थाला शिजवा किंवा मीठ-मसाला टाकून सूप बनवून खा. हिवाळ्यात ते उष्णता देण्याचे काम करते. ग्रीन सलाड, योगर्टसोबत बीन्स टेस्टी लागतात. २. मटारहिवाळ्यात मटारचे खूप उत्पादन होते. मटार स्वस्त असते आणि कोणत्याही भाजीमध्ये मिक्स होऊन जाते. ताजे मटार घालून तुम्ही मेथी मटार, आलू मटार किंव मटार पनीर अशा चविष्ट डिशेस बनवू शकता. ३. पनीरप्रोटीनचा उच्च स्रोत म्हणजे पनीर. कोणत्याही भाजीची चव वाढविण्याचे काम पनीर करते. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनाच पनीर आवडते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश केला पाहिजे. ४. मसूरची डाळसर्वच डाळी प्रोटीनयुक्त असतात. परंतु मसूरच्या डाळीला भिजवावे लागत नसल्यामुळे त्यांपासून झटपट जेवण तयार करता येते. सफरचंद, सेलरी आणि लिंबाच्या रसासोबत सलाडमध्ये मसूर टाकून खाता येते. ५. घट्ट योगर्टसामान्य योगर्टच्या तुलनेत घट्ट योगर्टमध्ये दुप्पट प्रोटीन असतात. हिवाळ्यामध्ये सलाडसोबत किंवा गाजर व काकडी त्यामध्ये बुडवून खाऊ शकता. किंवा योगर्ट जसेच्या तसेसुद्धा खाऊ शकता.