प्रियंकाकडे वेळच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:59 IST
'क्वांटिको' मुळे घराघरात पोहोचली प्रियंकाकडे वैयतीक आयुष्य जगण्यासाठी वेळच नाही..
प्रियंकाकडे वेळच नाही
प्रियंका चोप्रा दिवसाला सोळा तास काम करत असून पैसा आणि मानसन्मान मिळवितांना वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी तिच्याकडे वेळच नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियंका अमेरिकेन टीव्ही शो 'क्वांटिको' मुळे घराघरात पोहोचली आहे. ती म्हणते,' यश हे काही ध्येय नाही. यश हा एक प्रवास आहे. जर तुम्ही नेहमी जिंकत असाल तरच तुम्ही यशस्वी आहात. मी पैसा मिळवण्यासाठी खुप कष्ट घेते. मी रात्री झोपत सुद्ध नाही. १६ तास काम करीत राहते. मला आठवड्याला सुटी नाही, वाढदिवस नाही की दिवाळी नाही.' इंडस्ट्रीत दीपिका आणि प्रियंका यांची मैत्री खास आहे. त्याविषयी बोलताना पीसी म्हणते,' आमच्या दोघींच्या मित्रमैत्रीणी एकसमानच आहेत. आम्ही पिरला आणि डिनरला सोबतच जातो. साधारण लाईफस्टाईल आम्ही कधीच जगू शकत नाही.'