शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:09 IST
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची प्रकृती ही महत्त्वाची असते. तब्येत खराब असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपले आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवाल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. शरीराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्या टिप्स या ठिकाणी देत आहोत...
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी
जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची प्रकृती ही महत्त्वाची असते. तब्येत खराब असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपले आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवाल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. शरीराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याच्या टिप्स या ठिकाणी देत आहोत...पिण्याचे पाणीदररोज किती पाणी प्यावे हे व्यक्तीसापेक्ष अथवा परिस्थितीनुसार बदलत असते; मात्र तुम्ही योग्य त्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. मानवी शरीरातील सर्वाधिक क्रिया या पाण्यामुळे होत असतात. तुम्हाला नक्की किती पाणी हवे हे सांगता येत नाही. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर हे अवलंबून आहे. तुम्ही काय काम करता, कुठे राहता, तुमची प्रकृती आणि बाळंतपणावेळी किंवा दूध पाजण्याप्रसंगानुसार ते अवलंबून आहे.योग्य व्यायामउत्तम शरीरासाठी दररोज अथवा टप्प्याटप्प्याने व्यायाम करणे आवश्यक आहे. तुमचे शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. ज्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, योग्य पचनक्षमता, मनाचा ताजेपणा आणि शरीरातील अवयव याची काळजी घेता येते. व्यायामामुळे चयापचय क्रिया, मेदाचे ज्वलन यावर परिणाम होतो. मानवाच्या रचनेनुसार व्यायाम कसा करावा हे ठरते. भारोत्तोलन, उड्या मारणे, पोहणे असे व्यायाम करावेत.संतुलित आहारमानवी शरीरासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आवश्यक प्रमाणानुसार आणि विविध कार्यक्षमतेनुसार आहारात काय असावे हे ठरविले जाते. त्यात प्रथिने, लोह यांचे प्रमाण किती असावे हे सांगितले जाते. ताज्या पालेभाज्या, फळे, मांस यांचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. योग्य झोपतुमचे शरीर तंदुरुस्त असावे यासाठी योग्य प्रमाणात झोप मिळणे गरजेचे आहे. वेळेवर झोप न झाल्यास अनेक आजार उद्भवतात. तुमच्या कार्यक्षमतेत बिघाड होऊ शकतो. वयोमानानुसार तुम्हाला किती झोप हवी हे सांगण्यात येते. लहान मुलाला ८ तास, युवकांना ७ तास आणि वयोवृद्धांना सहा तास झोप आवश्यक आहे. बाळंतपणात इतर वेळेपेक्षा अधिक झोप आवश्यक आहे.विश्रांतीप्रत्येक मानवी शरीराला विश्रांतीची गरज आहे. मानवी शरीर हे यंत्राप्रमाणे आहे. जर अधिक काम करावे लागले तर याचे संतुलन बिघडते. मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. विश्रांती किती काळ घ्यावी याची वेळ नाही. पण तुमच्या शरीराला ताजेपणा मिळेल इतपत ती असावी. मनोरंजनात्मक कार्यक्रममानवी मेंदूला आणि शरीराला इतर गोष्टींची गरज असते. तुमचे मन योग्य तºहेने काम करावे आणि त्यावर ताबा असावा या दृष्टीने यांचा उपयोग होतो. तुमचे मन ताजेतवाने करण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतात. यामध्ये सुंदर ठिकाणे, मित्रांशी गाठीभेटी, क्लबना भेटी, सिनेमा यांचा समावेश आहे.खेळातील सहभागमैदानातील आणि मैदानाबाहेरील खेळाचा यशस्वी जीवनात अंतर्भाव गरजेचा आहे. मानसिक आणि शारीरिक श्रमाइतपत कष्ट पडेल इतके खेळ खेळणे आवश्यक आहे. बुद्धिबळ, स्नुकर, कार्ड यामुळे तुमची मानसिक क्षमता वाढते.