झोप येत नसेल तर वाढू शकते दुखणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:59 IST
तरुणांमध्ये आणि खास करून तरुण महिलांमध्ये झोपेच्या समस्यांमुळे पुढे चालून अनेक विकारांना सामोरे जावे लागते.
झोप येत नसेल तर वाढू शकते दुखणे
आजच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटकेच्या विश्रांतीलादेखील वेळ नाही. ताण, तणाव, चिंता यामुळे तरुणांमध्ये झोप न येण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुणपणी शरीर ठणठणीत असल्यामुळे याचे फार परिणाम दिसून येत नाहीत; पण उतार वयात याचा त्रास सहन करावा लागतो.एका संशोधनात असे दिूसन आले की, तरुणांमध्ये आणि खास करून तरुण महिलांमध्ये झोपेच्या समस्यांमुळे पुढे चालून अनेक विकारांना सामोरे जावे लागते.झोपेची समस्या असलेल्या सुमारे ३८ टक्के तरुणांमध्ये नंतरच्या वयात शारीरिक दुखणे वाढले तर झोपेचा त्रास नसलेल्या लोकांपैकी केवळ १४ टक्के लोकांना असा त्रास झाल्याचे समोर आले.याचे निदान लवकर झाले तर उपचार शक्य आहेत. पुढेचालून होणारी डोकेदुखी, पोटाचे आजारांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. संशोधकांनी 19 ते 22 वयोगटातील 1750 लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला.