शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अनेक उपाय करूनही केसगळती थांबत नाही? लगेच करा हा एक नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 11:16 IST

आज आम्ही तुम्हाला केसांसाठी लाल पाण्याचा कसा वापर करावा हे सांगणार आहोत. हा एक असा उपाय मानला जातो ज्याने तुमचे गेलेले केस परत येतील.

जास्तीत जास्त लोकांना आजकाल केसगळतीची समस्या भरपूर होते. कमी वयातच लोकांना टक्कल पडू लागलं आहे. अशात लोक केस पुन्हा येण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात किंवा केमिकल्सचा वापर करतात. मात्र, सगळ्यांनाच याने फायदा मिळतो असतं नाही. या गोष्टींचे अनेक साइड इफेक्ट्सही असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला केसांसाठी लाल पाण्याचा कसा वापर करावा हे सांगणार आहोत. हा एक असा उपाय मानला जातो ज्याने तुमचे गेलेले केस परत येतील. हे लाल पाणी तेल किंवा केमिकल्सची नाही तर नॅचरल गोष्टींचं असेल. हे पाणी केसांसाठी फार फायदेशीर असतं. 

केसांसाठी लाल पाणी

केसांसाठी हे खास लाल पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला बिटाची गरज लागेल. बिटाच्या लाल पाण्याने केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होते. चला जाणून घेऊ हे पाणी बनवण्यासाठी काय काय लागतं.

लाल पाणी बनवण्यासाठी वस्तू

अर्ध कापलेलं बीट, एक चमचा मेथीचे दाणे, १० ते १५ कढीपत्ते, रोजमेरीची काही पाने, दोन ग्लास पाणी.

कसं कराल तयार?

सगळ्यात आधी बीट बारीक करा. त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका वाटीमध्ये ठेवा.आता एक पातेलं घ्या आणि त्यात कापलेलं बीट, मेथीचे दाणे, कढीपत्ता, रोजमेरीची पाने आणि दोन ग्लास पाणी टाकून उकडायला ठेवा.

हे पाणी तोपर्यंत उकडू द्या जोपर्यंत पाणी गर्द लाल होत नाही. त्यानंतर गॅस बंद करा. नंतर हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये टाका.

केसांवर कसं लावाल हे पाणी?

हे लाल पाणी तुम्ही केसांवर दोन पद्धतीने वापरू शकता. पहिली पद्धत म्हणजे स्प्रे बॉटलने आधी हे पाणी डोक्याची त्वचा आणि केसांवर स्प्रे करा. तसेच त्यानंतर हलक्या हाताने केसांची मसाजही करा. हे पाणी जवळपास ३० मिनिटे केसांवर असंच राहू द्या.जेव्हा केस धुण्याची वेळ येईल तेव्हा एका वाटीमध्ये लाल पाणी घ्या आणि त्यात तुम्ही वापरता ते शाम्पू टाका. ३ मिनिटे याने केस चांगले स्वच्छ करा. नंतर पाण्याने केस धुवून घ्या. केसगळतीची समस्या काही दिवसांमध्ये कमी होईल. 

लाल पाण्याचे केसांना फायदे

या उपायामध्ये सगळ्या नॅचरल गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. जसे की, मेथी, कढीपत्ता, रोजमेरीची पाने. मेथीच्या बियांनी केसांना पोषण मिळतं आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे केसांची वाढ होते.  

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स