एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:29 IST
तुम्ही तरुण आणि उत्साही असलात आणि एनर्जी ड्रिंक घेत असलात तरी ते तुमच्या हृदयाला हानिकारक आहे.
एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी घातक
तुम्ही तरुण आणि उत्साही असलात आणि एनर्जी ड्रिंक घेत असलात तरी ते तुमच्या हृदयाला हानिकारक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. एनर्जी ड्रिंकमुळे रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा झटका येण्याची श्क्यता असते, असे एका अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.वयाने मोठी माणसे किंवा हृदयविकाराचा त्रास असणार्यांनाच याचा धोका असेल असा तुमचा समज असेल तर तेही चुकीचे आहे. कारण तरुण वयोगटातही हे हेल्थ ड्रिंक हार्मोन्स लेव्हलवर स्ट्रेस आणत असल्याचे आणि रक्तदाब वाढवित असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर रक्तदाब आणि हृद्याच्या ठोक्यांमध्ये होणारे बदल यांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी ज्यांची चाचणी घेण्यात आली त्यांना काहीही न खाता पिता दरदिवशी अल्कोहोल किंवा कॅफिन देऊन त्यानंतर त्यांच्या शरीरातील बदल टिपण्यात येत होते. कॅफिन, प्लाजमा ग्लुकोज आणि नॅरोड्रनलाईन यांच्यातील सिरमची पातळी तपासण्यात आली. त्यानंतर ३0 मिनिटांनी एनर्जी ड्रिंक दिल्यानंतर रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांचे रिडिंग नोंदवण्यात आले. या अभ्यासाचा निष्कर्ष डोळे उघडवणारा होता.प्लेसबो ड्रिंक घेतल्यानंतर कॅफिनची पातळी पूर्वीसारखीच होती मात्र एनर्जी ड्रिंक घेतल्यावर त्यात मोठय़ा प्रमाणात बदल आढळून आला. एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर रक्तदाब ६.२ ने वाढलेला दिसला. या एनर्जी ड्रिंकमधील कॅफीन आणि स्टिम्युलंटस हे यासाठी कारणीभूत आहेत. अधिक प्रमाणात असलेल्या कॅफीन आणि स्टिम्युलंटसमुळेच शरीरावर घातक परिणाम होत असल्याचे संशोधक व डॉक्टर यांनी सांगितले.