जीभ जळाल्यानंतर करा हे घरगुती उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:05 IST
कधी गरम गरज चहा व कॉफीनेसुद्धा आपली जीभ जळते.
जीभ जळाल्यानंतर करा हे घरगुती उपचार
जीभ जळाल्याने त्याचा त्रासही खूप जाणवतो. जीभ जळाल्याने कोणत्याही जेवणाची आपल्याला चवच कळून येत नाही. त्याकरिता गरम पदार्थ व पेय खाणे टाळावे. जळालेल्या जीभेचा त्रास होऊ नये, याकरिता विविध प्रकारचे घरगुती उपाय आहे. त्याकरिता कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या आपण हे उपचार करु शकतो. बेकिंग सोडा : जीभ जळाल्यानंतर हा सोडा पाण्यात टाकून सेवन करावा. त्यामुळे सुद्धा तुमच्या जिभेला त्रास होता आराम जाणवतो.मसालेदार जेवण टाळावे : आपण जर दररोज मसोलदार जेवण करीत असाल तर जीभ जळाल्यानंतर त्या दिवशी ते जेवण टाळावे. त्याऐवजी सलाड व उकलेले कोणतेही पदार्थ घ्यावे. त्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो.