अॅप्रेक्सिया बनू शकतो घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 03:53 IST
अॅप्रिक्सिया पुढे चालून मेंदूविषयक अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो
अॅप्रेक्सिया बनू शकतो घातक
एका स्टडीनुसार स्पीच प्रोग्राम आजार अॅप्रिक्सिया पुढे चालून मेंदूविषयक अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. अॅप्रिक्सियामध्ये रुग्णांना बोलताना त्रास होतो. संशोधकांच्या मते अप्रिक्सियाचे रुपांतर अनेक न्युरोलॉजिक डिसआॅर्डरमध्ये रुपांतर होऊ शकते, ज्यामध्ये डोळ्यांची हालचाल, हात पायाची क्षमता कमी होऊन काळानुसार आणखी गंभीर होणार.मिनोसोटामधील मायो क्लिनिकच्या संशोधकांनी माहिती दिली की, सुरुवातीला केवळ एखादा शब्द उच्चारण्यास त्रास होण्यापासून हा आजार सुरू होतो. पुढच्या सहा वर्षांत तो आणखी बळावून रुग्ण काही बोलू शकत नाही, तो पंलगावर खिळून पडतो. काही जण तरी पूर्णपणे मुकेदेखील होऊ शकतात. हळूहळू बोलणे, उच्चार करण्यात नेहमी चुकणे, अडखळत बोलणे, बोलण्यास त्रास होणे, जास्त वेळ न बोलता येणे अशी काही अप्रिक्सियाची प्रमुख लक्षणे आहेत. बहुतांश केसेसमध्ये डॉक्टरांकडून बोलण्याच्या अॅप्रिक्सियाचे निदान होत नाही. त्यामुळे तो बळावल्यावरच नंतरच्या स्टेजमध्ये त्यावर उपचार सुरू होतात.