शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

गरजेपेक्षा जास्त खाण्याची 5 कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:52 IST

आजकाल लोक 'हेल्थ कॉन्शिअस' म्हणजे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. व्यायाम आणि पोषक आहाराला ते महत्त्...

आजकाल लोक 'हेल्थ कॉन्शिअस' म्हणजे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. व्यायाम आणि पोषक आहाराला ते महत्त्व देतात. इतके असूनही काही ना काही कारणांमुळे बर्‍याचदा आपल्याकडून अनहेल्थी पदार्थ खाल्ले जातात. आणि मग दुसर्‍या दिवशी आपण त्याचावर विचार करत बसतो. परंतु स्ट्रिक्ट डाएट प्लॅन असूनही आपण गरजेपेक्षा जास्त का खातो या मागे काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारणे म्हणजे :१. मित्रमित्रमंडळी म्हटले की दिवसभर अचरबचर खाणे आलेच. गप्पा-गोष्टींच्या ओघात मग समोसे, कचोरी, बर्गर, पिझ्झा तर मागावलाच जातो. आता मित्रांना कसे नाही म्हणणार या भीतीमुळे कळत-नकळत आपण आरोग्यास नुकसानदायी पदार्थ खातो. पण स्वत:च्या तब्येतीची काळजी जास्त महत्त्वाची. मित्रांना खरे कारण सांगा. ते नक्कीच समजून घेतील.२. थकवाबरेच लोक थकवा आला म्हणजे भूक लागली अशी गफलत करतात. अपुर्‍या झोपेमुळेदेखील थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दररोज ६-८ तास झोप अत्यंत गरजेची आहे. तसेच लक्ष द्या की दिवसाच्या कोणत्या वेळेला तुम्हाला असा थकवा जाणवतो. याचा पॅटर्न समजला तर जंक फुड खाण्यावर तुम्ही लगाम लावू शकता.३. घाईमध्ये खाणेजे लोक घाईघाईमध्ये जेवण करतात ते गरजेपेक्षा जास्त खातात. जर तुम्ही १0 मिनिटांच्या आत ताटावरून उठत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. आरामशीर, कसलीही घाई न करता, एक-एक घास चावत खा. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते.४. बोअर होणेकाही सुचतच नाहीए, एकदम बोअर होतय, काही करायलाच नाही म्हणून किती तरी लोक उगीच गरज नसताना खातात. जगातील सगळ्यात जास्त लोक हे कंटाळा आला म्हणून खातात आणि ओव्हरइटिंगचे शिकार होतात. त्यामुळे स्वत:ला कामात व्यस्त ठेवून अशा वाईट सवयीपासून स्वत:ला दूर ठेवा.५. पाण्याचे प्रमाण कमीशरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्या तहानभूक जास्त लागते. त्यामुळे सदैव पाण्याची बॉटल जवळ ठेवा. दिवसभरातून अधूनमधून सतत पाणी पित राहा. जेवणाआधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. झोपताना आणि उठल्यावरही पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.