शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी, बिहारचा ६५-४१ ने पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 03:44 IST

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.

ललित नहाटाचेन्नई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने बिहारविरुद्ध ६५-४१ अशी दमदार बाजी मारत ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्यातील चारही क्वार्टरमध्ये वर्चस्व राखलेल्या महाराष्ट्राने बिहारला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीलाच महाराष्ट्राने अपेक्षित विजय मिळवताना प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला. पहिल्या क्वार्टरमध्ये काहीशी सावध सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राने १३-९ अशी आघाडी मिळवली. दुसºया क्वार्टरमध्ये मात्र आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्राने बिहारला दबावाखाली आणले आणि मध्यंतराला २४-१५ अशी एकतर्फी आघाडी घेतली. अमित गहोलत, राकेश सघवत आणि अ‍ॅरोन माँटेरियो या त्रिकूटाने वेगवान खेळ करताना बिहारला आक्रमणाची संधी दिली नाही. तिसºया क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना बिहारवर तुफानी हल्ले करता ५६-३४ अशी भक्कम आघाडी मिळवली.महाराष्ट्राकडून अमितने सर्वाधिक १९ गुण नोंदवले. तसेच अ‍ॅरोन आणि राकेश यांनी महत्त्वपूर्ण योगदान देताना प्रत्येकी ९ गुण मिळवले. बिहारकडून रोहित कुमार आणि संजीव कुमार यांनी अनुक्रमे १३ व १२ गुणांची कमाई करत अपयशी झुंज दिली.