शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्नायूदुखीमुळे श्रीकांतची चायना ओपनमधून माघार, विश्रांती घेतल्यानंतर हाँगकाँग सुपरसिरिजमध्ये दिसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 03:27 IST

नागपुरात तीन दिवसांआधी संपलेल्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य सामन्याच्या वेळी स्नायूदुखीचा त्रास झाल्याने विश्वक्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली.

नवी दिल्ली : नागपुरात तीन दिवसांआधी संपलेल्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य सामन्याच्या वेळी स्नायूदुखीचा त्रास झाल्याने विश्वक्रमवारीत दुस-या स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याला चायना ओपनमधून माघार घ्यावी लागली. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर तो हाँगकाँग सुपरसिरिजमध्ये खेळताना दिसेल. या स्पर्धेद्वारे अव्वल स्थान पटकाविण्याची त्याच्याकडे संधी असेल.सध्या दुस-या स्थानावर असलेला श्रीकांत १४ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या चायना ओपनमध्ये खेळणार नाही. नागपुरात त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. सातत्याने खेळत असल्यामुळे त्रास वाढला. पूर्ववत होण्यास एक आठवडा लागेल, असे श्रीकांतचे मत आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन खेळाडूंसोबत सल्लामसलतीनंतरच करण्यात आले. श्रीकांतला राष्ट्रीय स्पर्धेत त्रास झाला, हा योगायोग म्हणावा लागेल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले आहे. बीएआयचे महासचिव अनुप नारंग म्हणाले, ‘श्रीकांतच्या जखमेस राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन कारणीभूत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.(वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton