शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:27 IST

आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त भारताच्या पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करीत आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.

बर्मिंगहॅम : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त भारताच्या पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करीत आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाºया सिंधूने एक तास सात मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१३, १३-२१, २१-१८ अशी प्रतिस्पर्ध्यावर मात केली. २0१३ ची चॅम्पियन इंतानोन रेचानोक पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर जिंडापोल हिच्यावर मोठी जबाबदारी होती. तिने सुरेख खेळ केला; परंतु सिंधू तिच्यापेक्षा एक पाऊल पुढेच राहिली. या सामन्यात सिंधूचा तिच्याविरुद्ध रेकॉर्ड २-१ असा होता. सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला कोर्टच्या चोहोबाजूला पळवले. पहिल्या गेममध्ये दोघी सुरुवातीला ६-६ असे बरोबरीत होत्या; परंतु त्यानंतर सिंधूने ७-३ अशी आघाडी घेतली. तिने बॅकहँडवर जबरदस्त परतीचे फटके मारताना ८-३ अशी आघाडी घेत ती ब्रेकपर्यंत कायम ठेवली. ब्रेकनंतर तिची आघाडी १५-७ अशी झाली. प्रतिस्पर्धी खेळाडूदेखील दुहेरी गुणांपर्यंत पोहोचली; परंतु ती लय कायम ठेवू शकली नाही आणि सिंधूने पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये जिंडापोलने जोरदार मुसंडी मारत ७-३, ११-३ आणि १४-१0 अशी आघाडी घेतली. तथापि, सिंधूने सलग तीन गुण घेत ही आघाडी १३-१७ अशी केली. दोन फटके बाहेर गेल्याने जिंडापोलला ७ गुण घेण्याची संधी मिळाली आणि तिने गेम जिंकत बरोबरी साधली. तिसºया गेममध्ये सिंधूने सुरेख खेळ करीत सामना आपल्या नावावर केला.>प्रणॉयची विजयी सुरुवातत्याआधी बुधवारी रात्री एच. एस. प्रणॉयने आठव्या मानांकित चोऊ तियेन चेन याचा ९-२१, २१-१८, २१-१८ असा पराभव केला होता. आता तो इंडोनेशियाच्या टामी सुगियातो याच्याविरुद्ध खेळेल. प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी जर्मनीच्या मार्विन एमील सेइडेल आणि लिंडा एफलेर यांचा २१-१९, २१-१३, असा पराभव केला. आता ते चीनच्या वांग यिलयू आणि हुआंग डोंगपिंग यांच्याविरुद्ध खेळतील.