शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, सायना यांची दुसऱ्या फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 07:09 IST

स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत आपापले सलामीचे सामने जिंकून बुधवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

सिंगापूर : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी महिला एकेरीत आपापले सलामीचे सामने जिंकून बुधवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.चौथ्या मानांकित सिंधू हिने महिला एकेरीत एकतर्फी लढतीत इंडोनेशियाची लेनी अलेसांद्रा मैनाकी हिचा केवळ २७ मिनिटात २१-९,२१-७ ने पराभव केला. रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती सिंधूची पुढील लढत डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ट हिच्याविरुद्ध होईल.सहावी मानांकित सायनाने इंडोनेशियाची यूलिया योसोफिन सुसांतो हिचे आव्हान २१-१६, २१-११ असे परतवून लावले. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकची रौप्य विजेती सायनाला पुढील लढतीत सहकारी मुग्धा आग्रे आणि थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध खेळावे लागणार आहे.पुरुष दुहेरीत मात्र पहिल्याच फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. मनू अत्री-बी. सुमित रेड्डी यांची जोडी पहिल्या फेरीत सिंगापूरची नवखी जोडी डॅनी बाव-कीन हीन यांच्याकडून १३-२१, १७-२१ ने पराभूत झाली. सौरभ शर्मा-अनुष्का पारिख ही मिश्र जोडीदेखील थायलंडच्या जोडीकडून पराभूत झाली. प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांच्या जोडीने मात्र मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीने सहकारी अर्जुन एम. आर-के. मनीषा यांच्यावर २१-१८,२१-७ ने विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)श्रीकांतचाही विजयी श्रीगणेशामागच्या महिन्यात इंडिया ओपनचे उपविजेता ठरलेल्या किदाम्बी श्रीकांतनेही सकारात्मक सुरुवात करत दुसरी फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या लढतीत श्रीकांतने केवळ ४१ मिनिटांमध्ये बाजी मारताना थायलंडच्या सिटहीकोम थामासिन याचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. अन्य लढतीत पारुपल्ली कश्यप यानेही विजयी सलामी देताना जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या रासमस गेमके याला २१-१९, २१-१४ असे नमविले. समीर वर्माने आपल्या पहिल्या लढतीत थायलंडच्या सुपान्यु अविंहिगसानोन याचा २१-१४, २१-१६ असा पाडाव केला. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत बाजी मारताना एच. एस. प्रणॉयने फ्रान्सच्या ब्राइस लेवरडेज याचे कडवे आव्हान ११-२१, २१-१६, २१-१८ असे परतावले.