शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत पेट्रोलियम संघाची जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:50 IST

पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला.

नागपूर : पेट्रोलियम क्रीडा संवर्धन मंडळ (पीएसपीबी) संघाने सलग तिस-या वर्षी जेतेपदाचा मान कायम राखताना शुक्रवारी ८२ व्या राष्ट्रीय सिनियर बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक (७३ वी आंतरराज्य स्पर्धा) गटाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर ३-० ने सहज विजय नोंदविला.कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेच्या दुस-या दिवशी स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या पीएसपीबीने ओळीने सामने जिंकून ‘हॅट्ट्रिक’ साधली, चंदीगड आणि पटणा येथील राष्ट्रीय स्पर्धेतही पीएसपीबी संघ विजेता होता.भारतीय खेळाडूंमध्ये चौथे रँंकिंग असलेल्या श्रेयांशीने जी. ऋत्त्विका शिवानीला कडवे आव्हान दिले. शिवानीने पहिला गेम २१-११ ने जिंकला. दुसºया गेममध्ये संघर्ष करणाºया श्रेयांशीने २१-१९ अशी बाजी मारुन लढत बरोबरीत आणली. हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीत एकत्र सराव करणाºया या दोघींना परस्परांच्या उणिवा - बलस्थाने माहीत होती. निर्णायक गेममध्ये चुरस गाजली.एकवेळ १९-१८ असे गुण झाले. त्याचवेळी शिवानीने सलग दोन गुणांची कमाई करीत श्रीयांशीचा २१-१८ असा पाडाव केला. मिश्र गटाच्या पहिल्या सामन्यात प्रणव जेरी चोप्रा- एन. सिक्की रेड्डी यांनी श्रेयांशी परदेसी- पीयूष बोबडे या मध्य प्रदेशच्या जोडीला २१-११, २१-१२ ने नमवले.

टॅग्स :BadmintonBadminton