शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

पीबीएल : सिंधू पराभवाने चेन्नई पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:11 AM

भारताची बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू हिला चेन्नई स्मॅशर्सकडून खेळताना दिल्ली डॅशर्सची खेळाडू सुंग जी हुएन हिने १५-११, १३-१५, १४-१५ असे पराभूत केले, तर दिल्ली डॅशर्सच्या टियाने हुएई याने मिळवलेल्या विजयाने दिल्लीच्या बाद फेरीच्या आशा कायम आहेत.

लखनौ - भारताची बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू हिला चेन्नई स्मॅशर्सकडून खेळताना दिल्ली डॅशर्सची खेळाडू सुंग जी हुएन हिने १५-११, १३-१५, १४-१५ असे पराभूत केले, तर दिल्ली डॅशर्सच्या टियाने हुएई याने मिळवलेल्या विजयाने दिल्लीच्या बाद फेरीच्या आशा कायम आहेत.लखनौमधील बाबू बनारसीदास यूपी बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीत झालेल्या सामन्यात सिंधू हिने पहिला गेम १५-११ असा जिंकला. मात्र दुसºया गेममध्ये हुएन हिने आक्रमक खेळ करताना अखेरच्या क्षणी गुण मिळवत १५-१३ असा विजय मिळवला. यामुळे दोन गेमअखेर बरोबरी साधली गेली. निर्णायक गेममध्ये हुएन हिने एका गुणाच्या फरकाने सिंधूला पराभूत केले.भारताचा बी. सुमित रेड्डी आणि यांग ली यांनी इवान सोजनोव आणि व्लादिमीर इवानोव यांना १५-११, १५-१३ असे पराभूत केले.या लढतीत पहिल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित रेड्डीने यांग लीच्या साथीने विजय साजरा केला.पुरुष एकेरीत दिल्लीच्या वींग की वोंग विन्सेट याने चेन्नई स्मॅशर्सच्या ब्रीस लेव्हरडेझ याला १५-१०, १५-१३ असे पराभूत केले. विन्सेट याने पहिला गेम सहजतेने जिंकला, मात्र दुसºया लढतीत ब्रीस याने त्याला चांगलेच झुंजवले. एकवेळ ब्रीस आघाडीवर होता. मात्र विन्सेट याने चांगली आघाडी घेतली आणि विजय मिळवला.पुरुष एकेरीच्या दुसºया सामन्यात टियान हुवेई याने तानोन्सांग याला पराभूत करीत चेन्नईच्या या लढतीतील अपेक्षा कायम ठेवल्या.ताइ जु निंजा वॉरियरसारखी आहेभारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने तैवानची जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला खेळाडू ताइ जु यिंग हिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताला तिला ‘निंजा वॉरियर’ असे संबोधले. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) सलग दहावा विजय मिळवणाºया प्रणॉयने म्हटले, ‘ताइ जु एक जबरदस्त खेळाडू असून ती मला एका निंजासारखी भासते. ती काही स्ट्रोक अशा पद्धतीने खेळते, ज्याच्यावर तुम्ही एक दशकापर्यंत अभ्यास करावा लागेल.त्यानंतरही तुम्हाला त्या स्ट्रोकवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यातअडचणी येतील.तिच्या हातात अविश्वसनीय अनुभव असून ती अशी मुलगी आहे, जी बॅडमिंटन खेळताना खेळाचा सर्वाधिक आनंद घेते. यामुळेच ती विशेष खेळाडू ठरते.’‘मी तिच्यासह एकाच संघात असल्याचा मला आनंद आहे. शिवाय सराव सत्रात तिच्याविरुद्ध खेळण्याची संधीही मिळत आहे,’ असेही प्रणॉयने या वेळी म्हटले. ताइ जु हिने यंदाच्या सत्रामध्ये तब्बल ५ सुपरसिरिज जेतेपदे पटकावली.तसेच, पीबीएलमध्ये आतापर्यंत तिने सलग तीन सामने जिंकले आहेत. तिने अवध वॉरियर्सकडूनखेळत असलेल्या स्टार सायना नेहवालविरुद्ध आपला अखेरचा विजय नोंदवला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू