शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू, प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 03:36 IST

पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने भारताचे आज इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जकार्ता : पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने भारताचे आज इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.सिंधूला जगातील सातव्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ही बिंगजियाओ हिच्याकडून २१-१४, २१-१५ असा पराभव पत्करावा लागला. सिंधूचा तिच्याविरुद्ध ११ सामन्यांतील हा सहावा पराभव होता. दुसरीकडे भारताचा प्रणॉय आॅल इंग्लंड चॅम्पियन शी युकी याच्याकडून पराभूत झाला. प्रणॉयने युकीच्या आव्हानाचा सामना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु तो टिकाव धरू शकला नाही. तृतीय मानांकित चीनच्या खेळाडूने दोन्ही गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेत हा सामना २१-१७, २१-१८ असा जिंकला.पहिल्या गेममध्ये युकीने ६-३ आघाडी घेतली आणि नंतर ती ११-८ अशी वाढवली. त्यानंतर चार गुण घेत प्रणॉयला मुसंडी मारण्याची संधी न देता हा गेम जिंकला. दुसºया गेममध्ये प्रणॉय दबाव झुगारू शकला नाही.सिंधू व बिंगजियाओ यांनी आक्रमक खेळ केला. चिनी खेळाडूने १0-८ अशी आघाडी घेतली; परंतु सिंधूने मुसंडी मारत हे अंतर ११-१0 असे केले. सिंधू आपल्या गुणांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि बिंगजियाओने त्याचा पूर्ण फायदा घेतला. सिंधूचे एक व्हिडिओ रेफरलदेखील फेटाळले गेले. त्यानंतर बिंगजियाओने पहिला गेम जिंकला. दुसºया गेममध्ये सिंधूने ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु बिंगजियाओने ६-६ अशी मुसंडी मारली व नंतर तिने १0-८ अशी आघाडी घेतली. सिंधूला लय सापडली नाही आणि तिचे स्ट्रोक्सदेखील अचूक नव्हते. तिचा शॉट नेटमध्ये गेला आणि पुन्हा अचूक परतीचा फटका मारण्यात ती अपयशी ठरली आणि त्यानंतर तिने सामना गमावला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton