शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन : प्रणय, कश्यप विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:17 IST

यूएस ओपन विजेता एच.एस. प्रणय आणि राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप यांनी न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत दुस-या फेरीत प्रवेश

आॅकलंड : यूएस ओपन विजेता एच.एस. प्रणय आणि राष्ट्रकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप यांनी न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत दुस-या फेरीत प्रवेश केला, तर विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवणारा अजय जयराम याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.चौथ्या मानांकि त प्रणयने इंडोनेशियाच्या शेसार हिसेर रुस्टाविटोचा २१-१४, २१-१६ ने पराभव केला. १५ व्या मानांकित कश्यपने इंडोनेशियाच्या डी हेओम रुम्बाकावर २१-५, २१-१० ने सहज सरशी साधली. प्रणयला आता इंडोनेशियाच्या फिरमान अब्दुल खोलिकविरुद्ध खेळावे लागणार आहे, तर कश्यपची लढत स्थानिक खेळाडू आॅक्सर गुओविरुद्ध होईल. युवा बॅडमिंटनपटू सिरिल वर्मा, प्रतुल जोशी, सौरभ वर्मा, नीरज वशिष्ठ व साहिल सिपानी यांनीही विजयी सुरुवात केली. सातव्या मानांकित सौरभने आॅस्ट्रेलियाच्या नाथन तांगचा २१-१७ , २१-१५ ने पराभव केला. सिरिलने इंडोनेशियाच्या रियांतो सुबाजाविरुद्ध २१-१३, २१-१२ ने विजय मिळवला.प्रतुलने स्थानिक खेळाडू डॅक्सोन वोंगचा २१-१०, २१-१३ ने पराभव केला. नीरजने इंडोनेशियाच्या अ‍ॅण्ड्य्रू युनांतोचा २१-८, २१-९ ने, तर साहिलने न्यूझीलंडच्या जोशुआ फेंगचा २१-१०, २१-१० ने पराभव केला.जयरामला चिनी ताइपेच्या चिया हुंग लूविरुद्ध २१-१९, २१-१३ ने पराभव स्वीकारावा लागला. प्रतुलला यानंतर अव्वल मानांकित चिनी ताइपेच्या झू वेइ वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर नीरजची लढत आॅस्ट्रेलियाच्या अँथोनी जोविरुद्ध होईल. सौरभला इंडोनेशियाच्या हेनरिको खो विबोवाविरुद्ध तर साहिलला ११ व्या मानांकित चिनी ताइपेच्या लिन यू सियेनविरुद्ध खेळावे लागले. सिरिलची गाठ इंडोनेशियाच्या सपुत्रा विकी एंगाबरोबर पडणार आहे.भारताचे सिद्धार्थ ठाकूर, सचिन रावत, अरुण कुमार व अशोक कुमार यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीमध्ये संयोगिता घोरपडेला न्यूझीलंडच्या शी योंगशीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. (वृत्तसंस्था)