शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सर्विसचा नवा नियम पारदर्शक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:00 IST

‘जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्विसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल.

रोहित नाईक मुंबई : ‘जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्विसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्विसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्विस फॉल्ट ठरविणे हे प्रत्येक पंचाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. हा नियम पारदर्शक नसल्याने येत्या काही काळात हा नियम रद्द केला, तर नक्कीच याचा फायदा खेळाडूंना होईल,’ असे मत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.४ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने त्याने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. बॅडमिंटनमध्ये सर्विसच्या बदललेल्या नियमांचा फटका काही दिवसांपूर्वीच भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतला बसला होता. यामुळे आॅल इंग्लंड स्पर्धेतून त्याला अनपेक्षितपणे आपला गाशा गुंडाळावा लागला होता. याविषयी प्रणॉय म्हणाला की, ‘नवीन नियम अंमलात आणल्यापासून माझ्या सर्विसमध्ये एकदाही दोष आढळला नाही. नव्या नियमानुसार सर्विस चुकीचे ठरविणे हे पूर्णपणे पंचांच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. प्रत्येक पंच याकडे आपल्या परीने पाहात असल्याने, या नियमात पारदर्शीपणा नाही आणि त्याचा फटका खेळाडूंना बसतो. तरी बीडब्ल्यूएफच्या नियमांविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला नव्या नियमांप्रमाणे तडजोड करून खेळावेच लागते. कदाचित, पुढील २-३ महिन्यांमध्ये हा नियम रद्द करण्यात आला, तर निश्चित याचा खेळाडूंना फायदा होईल.’राष्ट्रकुलच्या तयारीबाबत प्रणॉय म्हणाला की, ‘आॅल इंग्लंड स्पर्धेनंतर राष्ट्रकुलसाठी तयारी करण्यास आम्हाला १० दिवस मिळाले. या कालावाधीत फार काही बदल करता आला नसले तरी चांगली तयारी झाली आहे. आता केवळ गोल्ड कोस्ट येथील परिस्थितींशी जुळवून घ्यायचे आहे.’भारतीय संघ कागदावर खूप मजबूत दिसत आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यासह दुहेरीतही भारतीय चांगले खेळत आहेत. सांघिक गटामध्ये भारताला पदक जिंकण्याची खूप चांगली संधी आहे. सांघिक गटात भारत सुवर्ण जिंकेल, अशी आशा आहे.- एच. एस. प्रणॉय