शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे, आयओएने दिला बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:29 IST

आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे.

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. राष्टÑकुलच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधू भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हा बहुमान सिंधूला दिला.२०१६ च्या रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती असलेल्या सिंधूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आयओएने दिली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. पिस्तूल नेमबाज विजय कुमार याला २०१४ च्या राष्टÑकुलचा आणि २००८चा आॅलिम्पिक चॅम्पियन नेमबाज अभिनव बिंद्रा याला २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा भारतीय ध्वजवाहक बनविण्यात आले होते. मेलबोर्न राष्टÑकुल स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात आॅलिम्पिक पदक विजेते असलेले राज्यवर्धनसिंग राठोड यांना हा बहुमान मिळाला. राठोड हे सध्या क्रीडामंत्री आहेत.वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता आॅलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला. सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्यासाठी सिंधूची झालेली निवड ही कामगिरीच्या आधारावर झाली असल्याचे आयओएने स्पष्ट केले आहे.(वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू