शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही - पी. गोपीचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:50 IST

भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून नसून भारतीय बॅडमिंटनला आता खोली प्राप्त झाली आहे, अशा शब्दांत मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची प्रशंसा केली.

हैदराबाद : भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून नसून भारतीय बॅडमिंटनला आता खोली प्राप्त झाली आहे, अशा शब्दांत मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची प्रशंसा केली.आॅस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावण्याव्यतिरिक्त बॅडमिंटनमध्ये आणखी पाच पदके पटकावली.सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले की, राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंदरम्यान रंगली, ही अभिमानाची बाब आहे.’महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या सायनाने सांघिक स्पर्धा जिंकणे अधिक समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. सायना म्हणाली, ‘माझ्यासाठी वैयक्तिक बाब अधिक महत्त्वाची नाही. पण, सांघिक स्पर्धेतील यश महत्त्वाचे आहे. चमकदार कामगिरीसाठी दुहेरीतील खेळाडूंची प्रशंसा करते. त्यामुळे एकेरीतील खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली.’‘या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी खूशआहे; पण भविष्यात यापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहील,’ असे सिंधू म्हणाली. महिला एकेरीच्या अंतिम लढतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सायना म्हणाली, ‘निश्चितच तुम्ही ओळखत असलेल्या खेळाडूविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असते.’ (वृत्तसंस्था)सांघिक स्पर्धेतील सुवर्णपदकाबाबत कधी विचार केला गेला नव्हता. संघाच्या कामगिरीमुळे हे शक्य झाले. गेल्या ३०-४० वर्षांत अनेकदा संघात केवळ एक-दोन खेळाडू मजबूत होते; पण आता स्थिती वेगळी आहे. आता संघातील प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे.- गोपीचंदसिंधूचा प्रतिहल्ला कमकुवत : विमल कुमारनवी दिल्ली: भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू प्रतिहल्ला करताना कमकुवत भासते त्यामुळेच राष्टÑकूल सहित अनेक महत्वाच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला, असे मत माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘ अंतिम सामन्यात सिंधू आक्रमक नव्हती. जेव्हा मोठी रॅली होते तेंव्हा सिंधू कमकुवत भासते. याचा नेमका फायदा सायनाने उठवला. सिंधू अजून तरुण आहे. परिपक्वता आल्यानंतर तिच्या खेळात नक्कीच सुधारणा होईल असे ते म्हणाले.

टॅग्स :BadmintonBadminton