शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यजमान महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात; पेट्रोलियम बोर्ड- म. प्रदेश यांच्यात सांघिक गटाची अंतिम लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:12 IST

जेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या महाराष्ट्र संघाचे आव्हान ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक फेरीत पहिल्या दिवशी संपुष्टात आले.

नागपूर : जेतेपदाच्या इराद्याने उतरलेल्या महाराष्ट्र संघाचे आव्हान ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या सांघिक फेरीत पहिल्या दिवशी संपुष्टात आले.कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली सुरू झालेल्या या स्पर्धेत गुरुवारी उपांत्य सामन्यात महाराष्ट्रा संघ गतविजेत्या पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड (पीएसपीबी) संघाकडून १-३ ने पराभूत झाला. दुसºया उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने मणिपूरवर ३-१ असा विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना आज शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासून पीएसपीबी-मध्य प्रदेश असा रंगणार आहे.सकाळच्या सत्रात उत्तर प्रदेशवर ३-२ असा विजय नोंदविणाºया महाराष्टÑ संघाला पीएसपीबीविरुद्ध सुरुवातीपासून पराभवाचा धक्का बसला. कर्णधार अक्षय देवाळकर- संजना संतोष ही जोडी मिश्र दुहेरीत मनू अत्री- सिक्की रेड्डी यांच्याकडून १६-२१, १४-२१ ने पराभूत झाली. पण कौशल धर्मामेर याने पुरुष एकेरीत गुरुसाईदत्त याच्यावर २१-१४, २०-२२, २१-११ ने विजय नोंदवीत लढत बरोबरीत आणली होती. महिला एकेरीत ऋत्त्विका शिवानीने नेहा पंडितचा पराभव करताच यजमान संघ माघारला. मनू अत्री-प्रणव जेरी चोप्रा यांनी अक्षय देवाळकर-प्रसाद शेट्टी यांच्यावर २१-१३, २१-९ असा विजय नोंदवित अंतिम फेरीचा मार्ग मोकळा केला. उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्टÑ संघाने उत्तर प्रदेशवर चमकदार विजय नोंदविला होता. यात नागपूरची खेळाडू वैष्णवी भाले हिने नोंदविलेला विजय निर्णायक ठरला. उत्तर प्रदेशची अमोलिका सिंग हिने महाराष्ट्राची नेहा पंडित हिच्यावर चमकदार विजय नोंदवत लक्ष वेधले. याशिवाय गतउपविजेता एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी (एएआय) संघाला मध्य प्रदेशकडून सलामीलाच पराभवाचा धक्का बसला.बॅडमिंटन निकालउपांत्य फेरी :- पीएसपीबी मात महाराष्ट्र ३-१ (मनू अत्री-सिक्की रेड्डी एन. मात अक्षय देवाळकर-संजना संतोष २१-१६, २१-१४), गुरुसाईदत्त आर.एम.व्ही. पराभूत विरुद्ध कौशल धर्मामेर १४-२१, २२-२०, ११-२१, रुत्विका शिवानी जी. मात नेहा पंडित २१-१२, २१-१५, मनू अत्री-प्रणव जेरी चोप्रा मात अक्षय देवाळकर-प्रसाद शेट्टी २१-१३, २१-९). मणिपूर पराभूत मध्य प्रदेश १-३ (डी.सिंग -पूर्णिमा देवी एन. पराभूत विरुद्ध खुशबू पटेल-शुभम प्रजापती २१-१९, १९-२१, १६-२१, एम. मैरबा मात शुभम प्रजापती २१-१२, २०-२२, २१-१८, अंगीता नौरेम पराभूत विरुद्ध श्रीयांशी परदेशी ४-२१, ५-२१, मंजित सिंग के- डी.सिंग पराभूत विरुद्ध आलाप मिश्रा-अभिमन्यू सिंग १६-२१, २०-२२).

टॅग्स :BadmintonBadminton