शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय यांची विजयी सलामी, कश्यप, सौरभचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:08 IST

कोलून : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय स्टार शटलर्सनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

कोलून : सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय स्टार शटलर्सनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना हाँगकाँग सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, अन्य लढतीत पारुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्मा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.लंडन आॅलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती सायनाने जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या मेट्टे पोलसेन हिचा २१-१९, २३-२१ असा पाडाव करत विजयी सुरुवात केली. पुढील फेरीत सायनापुढे आठव्या मानांकीत चीनच्या चेन युफेईविरुद्ध लढेल. युफेईने आॅगस्ट महिन्यात झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावले होते.त्याचवेळी, रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या सिंधूने शानदार विजयाची नोंद करताना हाँगकाँगच्या लियुंग युएत हिला २१-१८, २१-१० असे नमवले. सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना लियुंगला पुनरागमनाची संधी दिली नाही. स्पर्धेच्या दुसºया फेरीत सिंधूपुढे जपानच्या आया ओहिरी किंवा रशियाच्या एवजेनिया कोसेत्स्काया यांच्यातील एका खेळाडूविरुद्ध खेळेल.पुरुष गटात मात्र भारतला संमिश्र यश मिळाले. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रणॉयने झुंजार विजय मिळवताना हाँगकाँगच्या हू युन याचे कडवे आव्हान १९-२१, २१-१७, २१-१५ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर प्रणॉयने जबरदस्त पुनरागमन करताना युनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पुढील फेरीत प्रणॉय जपानच्या काजुमासा सकाइविरुद्ध खेळेल. नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सिरिजच्या उपांत्य फेरीत प्रणॉयने सकाइला नमवले होते.दुसरीकडे, राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेता कश्यपला पहिल्याच फेरीत कोरियाच्या ली डोंग कियूनविरुद्ध २१-१५, ९-२१, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले. पहिला गेम जिंकून आघाडी घेतलेल्या कश्यपला सातत्य कायम राखण्यात अपयश आले. तसेच, सौरभ वर्माही पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोकडून १५-२१, ८-२१ असा पराभूत झाला. (वृत्तसंस्था)>महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा - एन सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. अश्विनी - रेड्डी यांना चीनच्या हुआंग डोंगपिंग - ली वेनमेइ यांनी २१-११, १९-२१, २१-१९ असे नमवले.

टॅग्स :BadmintonBadminton