शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या अनुराची राष्ट्रीय शिबिरात निवड होईल - हिमांता बिसवा सरमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:13 IST

गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे.

पणजी : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे. कळंगुट येथे मंगळवारी भारतीय बॅडमिंटन संघटनेची निवडणूक झाली. त्यात आसामचे भाजप नेते हिमांता यांची बिनविरोध निवड झाली. नव्या कार्यकारिणीचा कालावधी २०१८-२०२२ असा असेल. या निवडणुकीनंतर हिमांता म्हणाले की, गोव्याची अनुरा सध्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे प्रत्येक वर्षी संघटना कोअर खेळाडूंची यादी पाठवत असते. मानांकनानुसार यादी बदलत असते. अनुराला मध्य सत्रात सहभागी होता आले नाही. आता एप्रिलमध्ये यादी निश्चित करण्यात येईल. त्यात तिचे नाव नक्की असेल, असेही त्यांनी सांगितले. 

संघटनेच्या आमसभेत राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय मानांकन स्पर्धेबाबतही निश्चित करण्यात आले. गोव्याला भारतीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले. १३ वर्षांखालील सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे होतील. सबज्युनियर (१५ आणि १७ वर्षांखालील) राष्ट्रीय स्पर्धा बंगळुरू (कर्नाटक) येथे होतील. १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद लखनऊला बहाल करण्यात आले. वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा हैदराबाद येथे होतील. आमसभेत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सर्व राज्य संघटनांना या खेळाच्या विकासासाठी ५ लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येईल. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेही भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे दिली जातील. दिल्लीचे अनुप नारंग यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यालयीन प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली. आम्हाला अधिक अकादमी उभ्या कराव्या लागतील. राज्य सरकारने यासाठी मदत करायला हवी. अन्यथा संघटना अशा साधनसुविधा उभ्या करू शकणार नाहीत. पुढील ४ वर्षांचेध्येय निश्चित करण्यासाठी लवकरच कार्यकारी समितीची बैठक घेण्यात येईल, असे हिमांता यांनी सांगितले. 

गोपीचंद मुख्य प्रशिक्षक आमसभेत राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांची पुढील ४ वर्षांसाठी वरिष्ठ गटासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. सध्या राष्ट्रकूल स्पर्धेच्या बॅडमिंटन पथकाचेही ते प्रमुख आहेत.छत्तीसगडचे संजय मिश्रा यांची ज्युनियर प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. गोपीचंद या खेळासाठी पूर्ण सकारात्मक असून संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. या निवडीनंतर गोपीचंद म्हणाले, गेल्या काही वर्षांत या खेळात दर्जेदार खेळाडू मिळाले आहेत. तळागाळातून खेळाडू पुढे येत आहेत. कौशल्य आणि टॅलेंट या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे या खेळाचे भविष्य उत्तम आहे.

टॅग्स :goaगोवाBadmintonBadminton