शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन : के. श्रीकांत अंतिम फेरीत, प्रणॉयचा केला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 03:27 IST

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ गेममध्ये पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

पॅरिस : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ गेममध्ये पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्रीकांतला पहिल्या गेममध्ये त्याच्या मनासारखा खेळ करता आला नाही. सूर न गवसलेल्या श्रीकांतला पहिली गेम १४-२१ ने गमवावी लागली. पण दुसºया आणि तिसºया गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे २१-१९ आणि २१-१८ असे गेम जिंकून प्रणॉयला पराभूत केले. ही लढत १ तास २ सेकंद चाली होती. या सत्रातील चौथे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीकांतची अंतिम फेरीत लढत जपानच्या केन्टा निशीमोटोविरुद्ध होईल. निशीमोटोने उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या अ‍ॅन्ड्रेस अ‍ॅन्टोसेनला सरळ दोन सेटमध्ये २१-१७, २१-१५ असे पराभूत केले.दुसरीकडे महिलांच्या एकेरीत विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. तिला जपानच्या अकाने यामागुचीने उपांत्य फेरीत २१-१४, २१-९ असे पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिचे स्वप्न भंग केले.पाचव्या मानांकित यामागुचीने भारतीय खेळाडूचे आव्हान अवघ्या ३७ मिनिटांत मोडीत काढले. तिने पहिला गेम १९ आणि दुसरा गेम १८ मिनिटांत जिंकला. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंत कडवी झुंज पाहायला मिळाली आणि एकवेळ १४-१४ अशी बरोबरी दोन्ही खेळाडूंत होती; परंतु यामागुचीने सलग सात गुण जिंकत पहिला गेम जिंकला.यामागुचीने आपल्या शक्तिशाली स्मॅशवर सिंधूला नेटजवळ येण्याची संधी मिळू दिली नाही. दुसºया गेममध्येदेखील यामागुची हिचे वर्चस्व राहिले. तिने सुरुवातीलाच ५-0 आणि नंतर ब्रेकपर्यंत ११-२ अशी आघाडी घेतली होती. 

टॅग्स :Sportsक्रीडा