शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:22 AM

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले.

दुबई : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. गुरुवारी सिंधूपुढे जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान असेल. त्याच वेळी, पुरुष गटात मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली. स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत यालाडेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.पदकाची दावेदार असलेल्या सिंधूने अपेक्षित सुरुवात करताना ही बिंगजियाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले. जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या सिंधूला या विजयासाठी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंगजियाओविरुद्ध झुंजावे लागले. पहिला गेममध्ये सहजपणे बाजी मारल्यानंतर बिंगजियाओने शानदार पुनरागमन करताना दुसरा गेम जिंकत सामना निर्णायक तिसºया गेममध्ये नेला. या वेळी, सिंधूवर काहीसे दडपण आले. तिसºया गेममध्ये सकारात्मक सुरुवात करताना तिने आघाडी घेतली; मात्र अखेरच्या काही क्षणामध्ये बिंगजियाओने झुंजार खेळ केला. तिने सलग दोन मॅच पॉइंट वाचवताना सिंधूवर कमालीचे दडपण आणले. मात्र, सिंधूने तिसºया प्रयत्नात नेटजवळ जबरदस्त नियंत्रित खेळ करताना बिंगजियाओला चूक करण्यास भाग पाडले आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.दुसरीकडे, पुरुष गटात भारताच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनविरुद्ध सलग दोन गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीपासून व्हिक्टरच्या वेगवान खेळापुढे पिछाडीवर पडलेल्या श्रीकांतला आपल्या पहिल्याच सामन्यात १३-२१, १७-२१ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)- पहिल्या गेमच्या तुलनेत दुसºया गेममध्ये झुंजार खेळ करताना श्रीकांतने आशा उंचावल्या होत्या. मात्र ११-१२ अशा एका गुणाच्या आघाडीवर असलेल्या एक्सेलसनने जबरदस्त खेळ करताना आपली आघाडी १६-१३ अशी वाढवली.यानंतर त्याने श्रीकांतवर अधिक दडपण आणत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीकांतला गुरुवारी तैपईच्या चोऊ तिएन चेनविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावेच लागेल.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू