शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू सुसाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:54 IST

दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला.

ठळक मुद्देसलग तिस-या विजयासह ‘अ’ गटात अव्वल

दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला. या शानदार विजयासह सिंधूने दिमाखात बाजी मारत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेल्या सिंधूसाठी तिसरा सामना औपचारीकतेचा ठरला होता. मात्र, सराव करण्याची याहून उत्तम संधी नसल्याची जाणीव असल्याने सिंधूने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत आपले वर्चस्व राखले होते. पहिल्याच गेममध्ये ५-० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या सिंधूने अखेरपर्यंत यामागुचीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि २१-९, २१-१३ असा दणदणीत विजय मिळवला. सिंधूने केवळ ३६ मिनिटांमध्ये विजयाची नोंद करताना ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवले. पहिला गेम सहजपणे बाजी मारलेल्या सिंधूला दुसºया गेममध्ये यामागुचीकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी यामागुची पुनरागमन करत सिंधूला झुंजवणार असे दिसत होते. मात्र, जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या सिंधूने आपला हिसका जपानी खेळाडूला दाखवला. एकवेळ यामागुचीने ४-४ अशी बरोबरी साधत सामन्यात रंग भरले खरे, परंतु यानंतर सिंधूने ७-५ अशी आघाडी घेत अखेरपर्यंत आपले वर्चस्व राखले. सिंधूच्या वेगवान खेळापुढे यामुगाचीला सूर गवसला नाही. सिंधूच्या नेटवरील जबरदस्त खेळापुढे यामागुचीने नियंत्रण गमावले. सिंधूने आपल्या सलामीच्या सामन्यात चीनच्या ही बिंगजियाओला नमवल्यानंतर, दुसºया सामन्यात जपानच्याच सायाका सातो हिचा २१-१३, २१-१२ असा धुव्वा उडवला होता. (

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू