शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल स्पर्धा : सिंधूला तंदुरुस्त होण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:35 IST

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल.

नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल.सिंधूला मंगळवारी गोपीचंद अकादमीत सराव करताना ही दुखापत झाली होती. त्यानंतर ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे समोर आले होते.सिंधू हिने सांगितले की,‘स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सर्वकाही ठीक चालले होते. दुर्दैवाने माझ्या घोट्याला दुखापत झाली. मला वाटते की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मी फिट होईल.’सिंधूला चार वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र आता बराच बदल झाला आहे. भारताची आघाडी खेळाडू असलेली सिंधू आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार आहे.सिंधू म्हणाली, ‘गेल्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले होते. या वेळी मी आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यास उत्सुक आहे. आम्ही नक्कीच पदक जिंकू. मला वाटते की राष्ट्रकुल स्पर्धेत मला आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागेल.’ (वृत्तसंस्था)यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल असा विश्वास सिंधूने व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘मी निश्चित पदकांची संख्या सांगू शकणार नाही. पण, यंदा भारतीय संघ नक्कीच खूप पदक जिंकण्यात यशस्वी होईल.’ सध्या फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूकडून प्रत्येकाला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.याविषयी ती म्हणाली की, ‘प्रत्येकाला माझ्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने माझी तयारीही सुरु आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असून प्रत्येकाची इच्छा आहे की मी विजयी व्हावं. मला माझा सर्वोत्तम खेळ करुन नैसर्गिक खेळ करावा लागेल.’

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sportsक्रीडाBadmintonBadminton