शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियमांवरून बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद संभ्रमात, प्रणाली बदलणार: २१ ऐवजी ११ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:03 IST

बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचा एक गेम खेळला जातो. बेस्ट आॅफ थ्री गेमच्या आधारे निकाल येत असतो. विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) प्रचलित पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टवर मार्गदर्शन करण्याची वेळही कमी करण्याच्या प्रस्तावित बदलामुळे प्रशिक्षक मात्र संभ्रमात आहेत.

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये सध्या २१ गुणांचा एक गेम खेळला जातो. बेस्ट आॅफ थ्री गेमच्या आधारे निकाल येत असतो. विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) प्रचलित पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टवर मार्गदर्शन करण्याची वेळही कमी करण्याच्या प्रस्तावित बदलामुळे प्रशिक्षक मात्र संभ्रमात आहेत.सामन्यादरम्यान प्रत्येक गेममध्ये ११ गुण झाल्यास कोर्टवर मार्गदर्शन करण्यास मान्यता आहे. सध्याच्या तीन गेमच्या जागी बेस्ट आॅफ फाईव्ह गेममध्ये सामना खेळविण्याचा प्रस्ताव असून २१ ऐवजी ११ गुणांचा सामना खेळविण्याचे नव्या नियमात प्रस्तावित करण्यात आले आहे.भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद म्हणाले, ‘कोर्टवर मार्गदर्शन करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात येणा-या नियमांमागील तर्क पटण्यासारखे नाहीत. संभाव्य बदलाचा सविस्तर ड्राफ्ट मी पाहिलेला नाही. आधी कोर्टवर मार्गदर्शन होत नव्हते तेव्हा हा नियम समाविष्ट करण्यात आला. आता पुन्हा नियंत्रण आणू इच्छितात. यामागील तर्क कळलेला नाही.’व्हिक्टर एक्सलसेन याला विश्व चॅम्पियनशिपचे सुवर्ण आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचविण्यारे डेन्मार्कचे मुख्य कोच केनेथ हे देखील कोर्टवर खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबाबत अनुकूल आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढते, असे त्यांचे मत आहे.(वृत्तसंस्था)निर्णयाचे समर्थनभारतीय संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार आणि सय्यद मोहम्मद आरिफ यांनी मात्र प्रस्तावित बदलाचे समर्थन केले. हा बदल खेळाडूंना भक्कम करेल, असे दोघांचे मत आहे. गुणांच्या प्रस्तावावर गोपीचंद म्हणाले, ‘सुरुवातीला काही खेळाडूंना लाभ होईल. पण नियम बदलण्याच्या कारणांवर मी समाधानी नाही.’