शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जयराम करणार भारताचे नेतृत्व, अमेरिकन ओपन बॅडमिंटन आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:45 IST

बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

फुलर्टन - बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.प्रणॉयने आगामी व्यस्त सत्राच्या पार्श्वभूमीवर फिटनेससाठी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आगामी कालावधीत अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा आहेत. त्यात मलेशिया ओपन, इंडोनेशिया ओपन, विश्वचॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धा आदींचा समावेश आहे.प्रणॉय म्हणाला, ‘मी अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होणार नाही. कुठल्या स्पर्धेत खेळायचे, याचा मी अद्याप निर्णय घेतलेला नाही.’ कश्यप पायाला झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला फेब्रुवारी महिन्यात आॅस्ट्रिया ओपनदरम्यान दुखापत झाली होती. कश्यप म्हणाला,‘आॅरलियन्स ग्रांप्रीनंतर दुखणे वाढले त्यामुळे मला खेळणे थांबवावे लागले. मी काही आठवड्यापूर्वी कोर्टवर पुनरागमन केले. थायलंडमध्ये मला खेळता येईल, अशी आशा आहे.’स्नायूच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आठ महिन्यांनी पुनरागमन करीत असलेल्या जयरामला पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूविरुद्ध पहिल्या फेरीत खेळावे लागणार आहे. सलामी लढतीत त्याला चांगल्या कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत अरुणा प्रभुदेसाईला कॅनडाच्या रशेळ होनद्रिचसोबत आणि वैष्णवी रेड्डी जाक्काची लढत दुसºया मानांकित जपानच्या सयाका सातोविरुद्ध होईल.पुरुष दुहेरीमध्ये दुसरे मानांकनप्राप्त भारतीय जोडी मनू अत्री व सुमित रेड्डी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. पात्रता फेरीत पुरुष एकेरीत अजय कुमारला कॅनडाच्या टिमोथी चीऊच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडाnewsबातम्या