शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कारची महत्त्वाची कागदपत्रे कोणती, त्यात काय असायला हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 10:30 IST

वाहनाची नोदणी कागदपत्रे, विमा कागदपत्रे आदी महत्त्वाची कागदपत्रे सतत तुमच्या कारमध्ये असावीत सर्व मूळ प्रती ठेवणे शक्य नसले तर झेरॉक्स प्रतीवर गॅझेटेड ऑफिसरच्या सही शिक्का असणारी प्रत मात्र जरूर ठेवा.

वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजे आरटीओकडून पूर्णपणे नोंदणीकृत व कायदेशीरदृष्टीने, नियमांच्यादृष्टीने पात्र असणे गरजेचे असते. त्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी मग ते नवे असो की जुने त्याची कागदपत्रे व आरटीओच्या नियमांमध्ये पात्र असलेले हवे.त्यासाठी आरटीओने त्या वाहनाची सारी संबंधित कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण केलेली हवी. हे सर्व करण्यासाठी प्रत्येक जण वैयक्तिक उपस्थिती लावून आपल्या कारचे काम काही पूर्ण करीत नाही. त्यामुळे कारची कागदपत्रे नेमकती कोणती असतात,ते पाहाणे व लक्षता ठेवून त्याची नोंद करणेही गरजेचे आहे. आयत्यावेळी कोणा सरकारी अधिकाऱ्याने, पोलीस व आरटीओ अधिकाऱ्याने मागमी केली तर ती कागदपत्रे गाडीमध्ये असणे गरजेचे आहे. सर्वसाधारण झेरॉक्स तरी ठेवा असे सांगितले जाते, मात्र केवळ झेरॉक्स ठेवणे कायद्याला धरून नाही, ते चालते इतक्याच निकषावर ग्राह्य आहे.तुमचे वाहन चारचाकी असेल तर त्यामध्ये कागदपत्रे ठेव्यासाठी नीट जागा असते.तसेच सर्वसाधारणपणे तुमच्या दुचाकी वाहनासाठीही ती जागा असते. मात्र खास करून मोटारसायकलमध्ये तितकी जागा नसते. त्यामुळे अनेकजण झेरॉक्सही पूर्ण ठेवत नाहीत. व्यावसायिक वाहने सोडून वैयक्तिक वापराच्या वाहनांमध्ये त्या वाहनाचे आर. सी. बुक, विमा पॉलिसी, पी.यू.सी., तसेच कारच्या वॉरंटीसंबंधातील कागदत्रे, खरेदीची कागदपत्रे, देखभाल कराराचे बुकलेट आदी कागदपत्रे असतात.यामध्ये आर. सी. बुक, वाहनाच्य़ा विम्याची पॉलिसी, व पी.यू.सी. ही कागदपत्रे असायलाच हवीत. त्यामध्ये पीयूसी मूळ हवे. तर आर. सी. बुक, विमा पॉलिसी याची झेरॉक्सप्रत असेल तर ती गॅझेटेड ऑफिसरची सही-शिक्का असलेली ठेवावीत. केवळ झेरॉक्स ठेवू नयेत. जरी सध्या कोणी विचारीत नसले वा केवळ विश्वासावर पोलीस तपासणीतून सुटत असलात, तरी कायद्यानुसार तुमच्या कागदपत्रांच्या या मूळ प्रती तुम्ह जवळ ठेवणार नाही, परंतु, गॅझेटेड ऑफिसरच्या सही शिक्क्याच्या या प्रती वाहनात असणे किमान गरजेचे आहे. पीयूसी हे मूळ असणे गरजेचे आहे. तर देखभाल व अन्य बाबींसाठी गरजेचे असणारे कंपनीच्या सेवाकेंद्राचे बुकलेट हे तुमच्या उपयुक्ततेसाठी आवश्यक असेल.