शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईपचा एलीट व्हिआर कनेक्ट स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: August 11, 2017 19:00 IST

स्वाईप कंपनीने आपला एलीट व्हिआर कनेक्ट हा फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,४४९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला असून यासोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत आहे.

स्वाईप कंपनीने आपला एलीट व्हिआर कनेक्ट हा फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,४४९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला असून यासोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत आहे.

स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना शॉपक्लुज या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले  प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेक एमटी ६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे रिलायन्सच्या जिओसह अन्य सेवांसाठी हे मॉडेल वापरता येणार आहे. तर उर्वरित कनेक्टिव्हिटींच्या पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस आदी पर्याय असतील. या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती मल्टी-टास्कींगसाठी उपयुक्त असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हे मॉडेल ब्लॅक, ग्रे, गोल्ड आणि रेड या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

नावातच नमूद असल्याप्रमाणे स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलमध्ये व्हिआर म्हणजेच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीला (आभासी सत्यता) संलग्न करण्यात आले आहे. या अनुषंगाने यासोबत एक व्हिआर हेडसेटदेखील प्रदान करण्यात आला आहे. काही फ्लॅगशीप मॉडेलसोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत असतो. या पार्श्‍वभूमिवर अतिशय किफायतशीर मूल्य असणार्‍या स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलसोबतही व्हिआर हेडसेट देण्यात असल्याची बाब लक्षणीय आहे. अर्थात हा या मॉडेलच्या विक्रीचा सेलींग पॉइंटदेखील बनू शकतो.